महत्वाच्या बातम्या

 जागतिक मौखिक दिनानिमित्य गडचिरोली जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी मौखिक तपासणी कार्यक्रमाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : जागतिक आरोग्य मौखिक दिनानिमित्य २० मार्च २०२३ ते २० मे २०२३ असे एक महिना मौखिक आरोग्य कर्यक्रम विविध ठिकाणी राबविण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय बस स्थानक, शासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालय आणि गडचिरोली जिल्हा खुले कारागृह इत्यादी ठिकाणी मौखिक आरोग्याचे शिबीर घेण्यात येत आहे. या शिबिरात मौखिक आरोग्याची काळजी कशा प्रकारे घ्यावी याची माहिती असलेले पॅम्प्लेट्स  वितरीत करण्यात येईल. तसेच एएनएम ट्रैनिंग सुद्धा घेण्यात येईल. त्याचप्रमाणे तंबाखू विषयी जाणीव जागृती कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

भारत एक विकसनशील देश आहे. जगाच्या पाठीवर भारत प्रत्येक गोष्टीत अग्रेसर बनत आहे. सर्वात जास्त तरुणवर्ग भारतात आहे. पण हाच तरुणवर्ग व्यसनाच्या विळख्यात अडकलाय. जगात तंबाखूचे उत्पादन घेण्यात चीन नंतर दुसरा क्रमांक भारताचा लागतो. कारण आपल्या देशात तंबाखू सेवन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. युवा पिढी व्यसनाने अखंड बुडलेली आहे व व्यसनात मश्गुल झालेली आहे. ही खूप मोठी शोकांतिका आहे. दातांची काळजी कशी घ्यावी, माणूस आपल्या कामात कितीही व्यस्त असला तरी तो आपल्या दातांची काळजी सहज घेऊ शकतो. त्यासाठी अगदी वेगळा वेळ काढावा असे काही नाही. दातांवर जेवणाचे कण अडकू न देणे, सकाळी आणि रात्री नियमीत दात घासणे, जेवणानंतर व्यवस्थित चूळ भरणे, डॉक्टरांनी सांगितलेल्या पध्दतीनेच दात स्वच्छ करणे या सर्व गोष्टींमुळे दातांवरचे जेवणाचे कण निघून जातात. जर दातांतील जेवणाचे कण साठून राहिले तर त्याला फूड लॉजमेंट म्हणतात. तोंडाची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. तोंडामध्ये लवकर न बरा होणारा जखम, व्रण असेल पांढरा चट्टा, लाल चट्टा व (ओएसएमएफ) तोंड जास्त उघडत नसेल तर त्वरित दंत शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे उपचारा करिता जावे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos