गुरुपल्ली येथे ना.श्रीमंत राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते सीएम चषकाचे थाटात उद्घाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली :
तालुका मुख्यालयापासून ५ कि.मी. अंतरावर असलेल्या गुरुपल्ली येथे स्व.श्रीमंत राजे सत्यवानराव महाराज क्रीडांगण येथे  आदिवासी विकास व वनराज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे  पालकमंत्री  ना.श्रीमंत राजे अम्ब्रीशराव आत्राम  यांच्या हस्ते सीएम  चषकाचे थाटात उद्घाटन करण्यात आले. या खेळामध्ये   व्हॉलीबॉल, कब्बडी, कॅरम, मॅरेथॉन ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा  २५ डिसेंबर पर्यंत चालणार आहे.
या वेळी मंचावर प.स.सदस्य जननार्धन नल्लावार , पोलीस पाटील  संजय गावडे  गुरूपल्ली , ग्रा.प.गुरुपल्ली च्या  सरपंचा  रूनिताताई तलांडे , न.प.अहेरी च्या  नगराध्यक्ष  हर्षाताई ठाकरे  , उपसरपंच  दशरथ अडगोपुलवार ग्रा.प.गुरुपल्ली, भाजप तालुका अध्यक्ष नवीन बाला  , भाजप शहराध्यक्ष  विजय नाल्लावार , ग्रा.प.तोडसा चे सरपंच  प्रशांत आत्राम ,  पाणी पुरवठा सभापती  सुनिताताई चांदेकर नं.प.एटापल्ली, युवा मोर्चा भाजप जिल्हा उपाध्यक्ष  अमोल गुडेलीवार , उषन्ना मेडीवार, राहुल मेश्राम, संपत पैडाकुलवार व गुरुपल्ली गावातील आणि अहेरी विधानसभातील खेळाडु उपस्थित होते. 
 प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत गुरुपल्ली पुनागुडा ते ताटीगुंडम ३ कोटी रुपयांचे रस्त्याचे भुमिपुजन  ना.राजे अम्ब्रीशराव  आत्राम  यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. तसेच  जिल्हा परिषद शाळा गुरुपल्ली येथे ना. राजे अम्ब्रीशराव  आत्राम  यांनी  सदिच्छा भेट दिली.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-13


Related Photos