महत्वाच्या बातम्या

 देसाईगंज तालुक्यातील साहिल साक्षकार रामटेके यांची राज्यस्तरीय युवा संसदेत निवड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : गडचिरोली जिल्हा हा अतिशय दुर्गम जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी या जिल्ह्यात मात्र युवकांच्या कौशल्याला वाव मिळत असल्याचे पुन्हा एकदा निष्पन्न झाले आहे. जिल्ह्यातील देसाईगंज पासून ५ किमी अंतरावर असलेल्या तुळशी येथील साहिल साक्षकार रामटेके या युवकांने सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. डिसेंबर २०२२ ला बिंझांनी महाविद्यालय नागपुर येथे युवक बिरादरी तर्फे अभिरूप युवा संसद ही विदर्भ स्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये साहिलने सर्वोत्कृष्ट सभापतीचा पुरस्कार प्राप्त केला. आणि त्यानंतर त्याची निवड राज्यस्तरीय युवा संसदेत झाली. 

ही राज्यस्तरीय युवा संसद १२ मार्च २०२३ ला मुंबई येथील मुकेश पटेल ऑडिटोरियम येथे पार पडली. यावेळी राज्यस्तरीय युवा संसदेत साहिल हा नागपूर विभागातून विरोधी पक्ष उपनेता म्हणून उपस्थित होता. या राज्य स्तरीय युवा संसदेत मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर असे विभाग सहभागी झाले होते. नागपूर विभागाचे नेतृत्व सचिन वाकुडकर यांनी केले. या राज्यस्तरीय युवा संसदेला मुख्य अतिथी म्हणून अभिनेते अभिषेक बच्चन, डॉ. आशिषराव देशमुख नागपूर, अमृता फडणवीस, पद्मश्री क्रांती शाह, स्वर तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

साहिलने अनेक वक्तृत्व स्पर्धा आणि वादविवाद स्पर्धांमध्ये सुयश प्राप्त केले आहे. सध्याचे त्याचे पदवीचे शिक्षण हे छात्रविर राजे संभाजी प्रशासकिय सेवा महाविद्यालय चंद्रपूर येथे सुरू असून साहिल हा एक उत्कृष्ट वक्ता आणि कवी सुद्धा आहे. साहिल वरती त्याच्या पुढील वाटचाली करीता युवक बिरादरी कडून, त्याच्या महाविद्यालया कडून आणि संपूर्ण जिल्ह्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos