मध्यप्रदेशात मुख्यमंत्रीपदावरुन काँग्रेसमध्ये रस्सीखेच


वृत्तसंस्था / भोपाल :  शिवराज सिंह चौहान यांनी आपण सत्तास्थापनेचा दावा करणार नसल्याचं जाहीर केल्याने मध्यप्रदेशात  काँग्रेसचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला आहे. काँग्रेसने १२१ आमदारांची यादी राज्यपालांकडे सोपवली आहे. समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्षासहित चार अपक्ष आमदारांचाही पाठिंबा असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. दरम्यान मुख्यमंत्रीपदावरुन काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं दिसत आहे. सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांचे समर्थक यावरुन भिडले असल्याचीही माहिती मिळत आहे.
आमच्याकडे १२१ आमदारांचा पाठिंबा असून, परिस्थिती स्पष्ट आहे असं काँग्रेस नेते नरेंद्र सलुजा यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर सांगितलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री पदावरुन सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यामध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं चित्र पहायला मिळत असून अद्याप कोणाचंही नाव घोषित करण्यता आलेलं नाही. संध्याकाळी काँग्रेस नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.
मध्य प्रदेशात बहुमत न मिळाल्याने आपण सत्तास्थापनेचा दावा करणार नाही असं सांगत शिवराज सिंह चौहान यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. शिवराज सिंह चौहान यांना तब्बल १५ वर्षानंतर राजीनामा द्यावा लागला आहे. स्पष्ट बहुमत न मिळाल्याने आम्ही सरकार स्थापनेचा दावा करणार नाही, असं स्पष्ट करत शिवराज सिंह राजीनामा देण्यासाठी राज्यपालांकडे निघाले. प्रसारमाध्यमांनी त्यांना प्रतिक्रिया विचारली असता, आता आपण मुक्त झालो असल्याचं त्यांनी सांगितलं.  Print


News - World | Posted : 2018-12-12


Related Photos