महत्वाच्या बातम्या

 संशोधनाकडे वळा या विषयावर हितकारिणी कनिष्ठ महाविद्यालयात व्याख्यान संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / आरमोरी : आरमोरी येथील हितकारिणी कनिष्ठ महाविद्यालयात मराठी विज्ञान परिषद आरमोरी विभाग व रासायनिक तंत्रज्ञान संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान संशोधनाकडे वळा या विषयावर व्याख्यान पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य रामा पाचपांडे होते. प्रमुख वक्ते म्हणून रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचे संशोधक डॉ. सुमित हजारे, प्रमुख अतिथी म्हणून परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. के. टी. किरणापुरे उपस्थित होते.

गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी येणाऱ्या भविष्याप्रति सजग राहून संशोधन कार्यात रुची वाढवावी. तसेच आपल्या संशोधनाचा उपयोग देशहितासाठी, समाजहितासाठी व नौकरी प्राप्त करुन सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी कसा उपयोग होतो. याविषयी विविध उदाहरणातून सुमित हजारे यांनी मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. के. टी. किरणापुरे यांनी अनेक संशोधकांविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांना संशोधनाकडे वळावे असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप प्रधान यांनी केले तर आभार दुर्वास बुद्धे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, चेतन ठाकरे, सतीश धात्रक, रजनी किरणापुरे, प्रा. प्रणाली गारोदे, श्याम बहेकर, हरेश बावनकर, राजेश हेडाऊ, बालकदास कोटरंगे आदींनी केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos