महत्वाच्या बातम्या

 पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची नवी दिल्ली येथे खासदार रामदास तडस यांनी घेतली भेट


- वर्धा लोकसभा क्षेत्रातील विविध विषयावर सकारात्मक चर्चा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (वर्धा) : आज नवी दिल्ली येथे भारताचे लोकप्रीय व यशस्वी प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांच्या समवेत वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार रामदास तडस यांनी भेट घेऊन वर्धा लोकसभा क्षेत्रातील विविध विषयावर सकारात्मक चर्चा केली व त्यांचे मार्गदर्शन घेतले.

आज भारताचे लोकप्रीय व यशस्वी प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांची संसद भवन येथे पंतप्रधान कार्यालयात भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केले, त्यांची भेट जोमाने जनतेचे कार्य करण्यासाठी नेहमीच एक नवीन ऊर्जा निर्माण करणारी ठरते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा अमूल्य वेळ उपलब्ध करून दिल्याबद्दल व मार्गदर्शनाबद्दल खासदार रामदास तडस यांनी पंतप्रधान महोदयांचे आभार मानले.  





  Print






News - Rajy




Related Photos