कारमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन दलालांना अटक, एका विद्यार्थिनीला घेतले ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  नागपूर : 
कारमध्ये सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर पोलिसांनी छापे घालून एका विद्यार्थिनीला ताब्यात घेतले तर दोन दलाल युवकांना अटक केली आहे .  योगेश शाहू (२३)  रा. इंदिरा गांधी नगर  आणि राहुल अनिल गवतेल (२१)  रा. ठक्‍करग्राम, पाचपावली  अशी अटक केलेल्या दलालांची नावे आहेत. विशेष म्हणजे सेक्स रॅकेटसाठी मोटारीच्या सिट्स काढून छोटा बेड बसवण्यात आला होता. सदर  कारवाई झोन पाचच्या पथकाने मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास जरीपटक्‍यात केली. 
गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त संभाजी कदम यांनी शहरातील सेक्‍स रॅकेटवर छापेमारी सुरू करताच अन्य पोलिस उपायुक्‍तांनीही परिसरातील देहव्यापाराच्या अड्ड्यावर छापे घालण्यास सुरूवात केली. झोन पाचचे उपायुक्‍त हर्ष पोद्‌दार यांच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्‍के यांना जरीपटक्‍यातील दिपक नगर विटाभट्‌टी परिसरात एका कारमध्ये सेक्‍स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाली. मंगळवारी रात्रीच्या सुमारास सोनटक्‍के यांनी सापळा रचला. पंटर पाठवून योगेश आणि राहूलची भेट घेतली. त्यांना आंबटशौकीन असल्याचे सांगून मुलीची मागणी केली. दोघांनी ३ हजार रूपयांत सौदा केला. त्यानंतर अंधारात उभ्या असलेल्या   एमएच ३१ -ईक्‍यू ०२७१ क्रमांकाच्या  अलिशान कारमध्ये पाठवले. त्या कारमध्ये पाच मिनीटात  एक २० वर्षाची तरूणी आली. तिने लगेच कारचा दरवाजा बंद केला. काही वेळातच पोलिसांनी छापा घातला आणि मुलीला ताब्यात घेतले. दोन्ही दलालांनाही अटक केली. पोलिसांच्या छापेमारीमुळे काळ्या फिल्म असलेल्या कारमधील सिट्‌स काढून छोटासा बेड बसवून सेक्‍स रॅकेट चालविणे सुरू केले. या शक्‍कलमुळे पोलिसही अचंभीत झाले.



  Print






News - Nagpur | Posted : 2018-12-12






Related Photos