महत्वाच्या बातम्या

 अखेर युवा नेते नीरज झाडे यांच्या प्रयत्नांना यश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : गोरक्षण वार्ड येथील हनुमान मंदिरामागील मोकळ्या जागेत माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेने ओपन जीम उभारले होते.  

परंतु जागा उपलब्ध न झाल्याने नीरज झाडे अनेक दिवसांपासून त्या जागेवर पेव्हर बसवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्याचा जसा वापर व्हायला पाहिजे तसा होत नसल्यामुळे हा विषय प्रशासनाकडे मांडणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्याच्यावर वन विकास महामंडळ माजी अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते चंदन सिंह चंदेल यांनी दखल घेतले आणि त्यांच्या शुभहस्ते भूमिपूजन झाले. चंदनसिंह चंदेल यांनी सदर ठिकाणी आणखी चांगले काय होऊ शकते. यासाठी नगर परिषदेला सूचना केले.

यावेळी भाजपा शहर अध्यक्ष काशिनाथ सिंह, शहर सचिव नीरज झाडे, शहर सचिव देवेंद्र वाटकर, उत्तर भारतीय मोर्चाचे शहराध्यक्ष हरे राम सिंह आदी यावेळी उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos