अखेर युक्रेन रशिया शांतीचर्चा : रशियाने माघार घेण्याची युक्रेनची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मास्को :
रशिया आणि युक्रेनमध्ये जोरदार युद्ध सुरु आहे. युक्रेनचे मोठे नुकसान झाले असताना रशियालाही युक्रेनने मोठा दणका दिला आहे. रशियाचे अनेक टॅंक नष्ट केले आहेत. दरम्यान, बेलारुसमध्ये युक्रेन-रशियामध्ये शांती चर्चा सुरु झाली आहे. रशियाने युद्ध थांबवावे आणि सैन्यही मागे घेण्यात यावे, अशी युक्रेनने मागणी केली आहे. 
अखेर युक्रेन रशिया शांतीचर्चा सुरू झाली आहे. रशियाने ताबडतोब युद्ध थांबवावे आणि सैन्य मागे घ्यावे, अशी मागणी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी केली आहे. बेलारूसच्या सीमेवर आज दोन्ही देश युद्धावर तोडगा काढण्यासाठी वाटाघाटी करणार आहेत. बेलारूसमध्ये युक्रेनचं शिष्टमंडळ दाखल झाले आहे. 
आधी बेलारूसमध्ये चर्चेसाठी युक्रेन तयार नव्हता. युक्रेनने वॉरसॉ या शहरात चर्चा व्हावी अशी मागणी केली होती. मात्र बेलारूसचे अध्यक्ष  लुकाशेन्को यांच्याशी झालेल्या फोनवरील चर्चेनंतर युक्रेनच्या अध्यक्षांनी बेलारूस सीमेवर चर्चा करण्यास सहमती दर्शवली आहे. ताबडतोब युद्ध थांबववावे आणि रशियाने युक्रेनमधून सैन्य मागे घ्यावे, या युक्रेनच्या प्रमुख मागण्या आहेत. 
दरम्यान, रशियाने युक्रेनच्या किव्ह शहरात रहिवासी वसाहतीत शिरून हल्ला केलाय. त्या  हल्ल्याची दृश्य समोर आली आहेत. किव्ह शहरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न रशियन सैन्य करतेय. त्यातून रहिवासी वसाहती देखील सुटलेल्या नाहीत. नजर जाईल तिथे आग आणि धूर, तसेच युद्धाच्या उद्ध्वस्त खाणाखुणा दिसत आहेत.  Print


News - World | Posted : 2022-02-28
Related Photos