महत्वाच्या बातम्या

 गडीसुर्ला येथे शाळा समिती व सखी महिला ग्राम संघाने विद्यार्थ्यांना दिले शिक्षणाचे धडे 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : मुल तहसील येथील गडीसुर्ला येथे शाळा व्यवस्थापन समिती व सखी महिला ग्राम संघाच्या सहकार्याने जिल्हा परिषद शाळा सुरू करण्यात आली. महाराष्ट्र शिक्षक शिक्षकत्तर कर्मचारी १४ मार्च २०२३ पासून जुनी पेन्शन योजना सुरू करावी या करिता बेमुदत आंदोलन पुकारले आहे. या बेमुदत संपामुळे शिक्षक शिकवायला येत नसल्यामुळे आणि मागील कोरोना काळात २ वर्षे वाया गेल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले म्हणून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, आर्थिक व गैरसोय होऊ नये म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, सखी महिला ग्राम संघाचे कर्मचारी यांच्या पुढाकाराने शाळा सुरू करण्यात आले.

तसेच वर्ग १ ते ७ पर्यंत विद्यार्थ्यांना शिकविण्यात आले. शाळेत सर्व विद्यार्थि हाजिरी लावली. शाळेला नेहमी मदत करणारे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद कावळे, महेश आंबटकर, शेख महमदतकी, हरि लेनगुरे, सचिन सोयाम, प्रीतम आकुलवार, तसेच ग्राम पंचायत सदस्य सौ. सोनाली शेंडे, सखी महिला ग्राम संघाचे सौ. निलोफर शेख, सौ. सीमा आंबटकर, सौ. दीक्षा मोहूर्ले, सौ. आचल आंबटकर, यांनी सहकार्य केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos