महत्वाच्या बातम्या

 रत्नापुरात पूणेचा भिडेवाडा प्रतीकृती पाहण्यासाठी व देवीच्या दर्शनासाठी भक्तजनाची गर्दी उसळली : जत्रेचे स्वरूप


- रोज दहा हजाराच्या वर भक्त जनाची हजेरी

- श्री गुरुदेव नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ रत्नापूरचा उपक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे कार्यरत १८ वर्षा पासुन असणारे श्री गुरुदेव नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ आहे. सदर मंडळाचे वतीने नवरात्र उत्सवात दुर्गा मातेची स्थापना करून दरवर्षाला देखावाचे प्रतीकृती तयार करुण भाविक भक्त-गण यांना दर्शनासाठी ठेवतात. सोबतच मंडळाचे वतीने सामाजिक जन सामान्य माणसाला उपयोगी येणारे कार्यक्रम उपक्रम मंडळचे वतीने संपूर्ण नव-दिवस राबविले जातात.या देखाव्याचे दर्शना साठी व या होणाऱ्या कार्यक्रम उपक्रमाच लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातीलच नव्हे तर जिल्ह्या बाहेरील जनता सुद्धा मोठ्या प्रमाणात रत्नापूर येत असते आणी या चालु वर्षात दुर्गा मातेची स्थापना झाल्यापासुन रत्नापुरात लोकांचं दोन चाकी, चारचाकी गाडीने लोकांचे जथ्येच्या-जथ्ये रत्नापूरात दाखल होत आहेत.

 सध्यास्थीतीत त्यांचे रोज दहा हजाराचे वर जनता दाखल होत असल्याचे चित्र असुन मंडळाचे वतीने कोणत्याही अनुचीत प्रकार घडु नये म्हणून संपूर्ण सदस्य योग्य प्रकारे कार्य करीत आहेत.

आणी येणाऱ्या भाविक भक्त गणाची गैरसोय होवू नये त्यांना येथे दाखल झाल्यावर संपूर्ण गोष्टीचा लाभ व आस्वाद घेता येवून जाता यावे यासाठी सर्व सोयी करुण ठेवण्यात आल्या असुन सर्व मंडळाचे पदाधिकारी व सदस्य कार्य चोखपणे बजावत आहेत.

मंडळातर्फ या चालु वर्षाला सामाजीक क्रांतीचे अग्रदुत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले व त्यांचे खाद्याला खांदा लावून समाज क्रांतीच्या अग्रदुत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दापंत्यांचा सामाजीक क्रांतीचा संपूर्ण जीवन पट समाजातील सर्व जाती, जनतेला माहीती झाला पाहिजे त्यांचे कार्य कसे होते याची सर्वांना जाणिव होवून हा इतिहास समाजातील प्रत्येक मनुष्याला प्राप्त झाले पाहीजे. हा दुष्टीकोण मंडळाने बाळगुन ही फुले दांपत्याच्या भिडे वाडा येथील प्रतीकृती रत्नापूर येथे सादर केली आहे.त्यात त्यांनी त्यांचे संपूर्ण कार्याचे जीवनपट रेखाटले आहे. हे बघण्यासाठी व दुर्गा मातेच्या दर्शनासाठी भाविक भक्त गन मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यामुळे सध्या रत्नापूरात जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले असुन या नवरात्र चालणार्‍या नव- दीवसाचे उत्सवात जवळपास ५० हजाराचे वर भाविक भक्त-गण दर्शन घेण्याची शक्यता आहे. आणी हया आज गर्दीचे स्थीती वरून नक्कीच घेतील.

या सुंदर रमनिय व समाज प्रबोधन पर देखावा व दुर्गा मातेच्या दर्शना सोबत येणारे भावीक यांना मेला-मिनाबाजार व सर्व प्रकारचे साहीत्य असणारे दुकानाचा सुद्धा आस्वाद व लाभ घेता येत आहे. आणी येणारी जनता ही या येथे मिळणारे सर्व गोष्टी चा आस्वाद घेवून वापस जात आहे व मंडळ सतत अविरत १८वर्षा पासुन हे सर्व करताना राबवित आहे. कोणताही अनुर्चीत प्रकार  घडू नये, याची पूरेपूर जबाबदारी स्वीकारून सर्व व्यवस्था चोखपणं बजावित आहेत. आणी या सर्व बाबीकडे मंडळ अध्यक्ष तथा माजी जी. प. सदस्य रमाकांत लोधे, उपाध्यक्ष संजय गहाणे, सचीव वामन जीवतोडे, सदस्य नरेंद्र गहाणे, मंगेश मेश्राम, मंगेश गभणे, इमारन पठान, जगदीश गहाणे,वासुदेव दडमल यांचेसह सर्व सदस्य लक्ष देवून सतत प्रयत्न करत आहेत. 





  Print






News - Chandrapur




Related Photos