महत्वाच्या बातम्या

 कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी बेमुदत संपाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा पाठिंबा


- जिल्हा परिषदेचे माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घेतली आंदोलनकर्ता कर्मचाऱ्यांची भेट

विदर्भ न्यूज एक्सप्रेस

तालुका प्रतिनिधी / अहेरी : जुनी पेंशन योजना लागू करावे, या उद्देशाने राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने सुरु झाले आहे.

१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त राज्य सरकारी/निमसरकारी तसेच सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना नवीन पेंशन योजना (NPS) रद्द करून जुनी पेंशन योजना (OPS) पुन्हा पूर्ववत लागू करावी, अश्या मागणीने सदर आंदोलन सुरु असून काल माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी अहेरी येथील आंदोलनकर्ता कर्मचाऱ्यांची भेट घेत पाठिंबा जाहीर केला आहे.

यावेळी शिक्षण कृती समिती तालुका शाखा अहेरी यांनी माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांना विविध मागण्यांचे निवेदनही सादर केले. याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आंदोलनकर्ता कर्मचाऱ्यांना दिले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos