महत्वाच्या बातम्या

 मॅजिक बस इंडिया फाउंडेशन तर्फे बियाणे वाटप


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : १३ ते १७ ऑक्टोबर २०२२ या कालावधी मध्ये मॅजिक बस या संस्थेच्या माध्यमातून चामोर्शी तालुक्यातील १२० घरांना किचन गार्डन बनविण्यासाठी बियाणे वाटप करण्यात आले. त्यामध्ये पालक, मेथी आणि चवळी हे बियाणे संस्थेच्या माध्यमातून देण्यात आले तर इतर काही बियाणे घरगुती वापरामधील असतील आणि हे देण्यामागील उद्देश म्हणजे मुलांना आणि पालकांना त्यांच्या घरचे पौष्टीक अन्न घरूनच घेता येईल आणि त्यासाठी लागणारा आर्थिक खर्च हा कमी होईल आणि घरीच भाजी असल्यामुळे विकत घेण्याची गरज नाही त्यामुळे मुलांना ज्यांच्या कडे जागा आहे आणि मुख्यतः मुलांना किचन गार्डन मध्ये आवड आहे त्यासाठी मॅजिक बस कडून त्यांना बियाणे वाटप करण्यात आले.
हा कर्यक्रम पारपडण्यासाठी युवा मार्गदर्शक रोशन तिवाडे, प्रफुल निरुडवार, पंकज शंभरकर, दीपक धपकस ,सोनी शिरकर, अश्विनी उराडे यांचा सहकार्य होते तसेच संस्थेचे वरिस्ट अधिकारी प्रशांत लोखंडे, तालुका समन्वयक योगिता सातपुते यांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम पार पडला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos