आमदार चषकातील स्पर्धेदरम्यान दुर्घटनाग्रस्तांना सर्वोतोपरी सहाय्य


- गर्दीमुळे घडली दुर्घटना, जखमीच्या उपचाराचा खर्च उचलणार : आमदार अ‍ॅड. संजय धोटे
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / राजुरा :
येथे काल १० डिसेंबर रोजी विदर्भस्तरीय आमदार चषकातील अंतिम सामन्यादरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळून अनेक प्रेक्षक जखमी झाले होते.  ह्या दुर्घटनेसंदर्भात आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की काल अंतिम सामन्यादरम्यान प्रेक्षक गॅलरीवर त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक लोक बसले शिवाय या गॅलरीवर बसलेल्या प्रेक्षकांपैकी काही जण उभे राहिल्यामुळे गर्दीचा भार न पेलवल्याने ही गॅलरी कोसळली व काही प्रेक्षक जखमी झाले.
यात उमेश रोगे ह्या युवकाला नागपूर येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत.
८ जखमी रुग्णांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ५ जनावर प्राथमिक उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.
राजुरा ग्रामीण रुग्णालयात ८ जखमींना भरती करण्यात आले असून ५ जणांना किरकोळ मार असल्याने प्रथमोपचार नंतर सुट्टी देण्यात आली आहे.
सदर दुर्घटना नियोजनाच्या अभावी घडली नसून स्पर्धेदरम्यान अतिशय चोख व्यवस्था होती.
परंतु गर्दी अनियंत्रित झाल्यामुळे व प्रेक्षक गॅलरीत काही प्रेक्षकांच्या हुल्लूडबाजी मुळे सदर दुर्घटना घडल्याचे त्यानी सांगितले,सदर दुर्घटनेत जखमी झालेल्यांना सर्वोतोपरी साह्य करणार असून त्यांच्या उपचाराचा खर्च उचलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सदर दुर्घटनेबद्दल आमदार अ‍ॅड.संजय धोटे यांनी खंत व्यक्त केली असून सामना बघण्याकरिता आलेल्या खेळप्रेमी नागरिकांना यामुळे जो त्रास सहन करावा लागला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

   Print


News - Chandrapur | Posted : 2018-12-11


Related Photos