महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत बंगाली भाषिक शिक्षकांना नियुक्तीचे आदेश द्या : आमदार डॉक्टर देवराव होळी


- शासन निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्याची विनंती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यासाठी खास बाब म्हणून गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत बंगाली  माध्यमांच्या प्राथमिक शाळेमध्ये रिक्त असलेल्या शिक्षण सेवकांच्या पदावर बंगाली भाषिक शिक्षकांची नियुक्ती करण्यासंदर्भात शासनाने २ वेळा निर्णय दिलेला असून त्या निर्णयाची अजून पर्यंत अंमलबजावणी न झाल्याने बंगाली भाषिक शिक्षकांची नियुक्ती रखडलेली आहे . त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांना तातडीने आदेशित करून बंगाली भाषिक शिक्षकांना नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी विधान परिषदेत चर्चेच्या प्रसंगी केली.

आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या बंगाली भाषिक प्राथमिक शाळांमध्ये खास बाब म्हणून बंगाली भाषिक शिक्षकांची नियुक्ती करण्यासंदर्भात शासनाला निर्णय घेण्याची मागणी सातत्यपूर्ण प्रयत्न करून लावून धरली. त्यास यश मिळाले व अखेर २३ सप्टेंबर २०२२ व ३० जानेवारी २०२३ रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने त्यासंदर्भात आदेश देण्यात आले. मात्र  मुख्य कार्यकारी अधिकारी गडचिरोली यांनी  त्या शासन निर्णयांची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे बंगाली भाषिक शिक्षकांवर अन्याय होत आहे. तरी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असून बंगाली भाषिक शिक्षकांवरील अन्याय दूर करीत त्यांना नियुक्ती करण्यात यावी व त्याकरिता जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आदेशित करण्यात यावे अशी मागणी आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी विधानसभेत केली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos