महत्वाच्या बातम्या

 २६ मे पर्यंत आंतरराष्ट्रीय रोजगार मेळावा आयोजीत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्यातील उमेदवारांना परदेशातील नोकरी उपलब्ध होण्यासाठी पहिला आंतरराष्ट्रीय रोजगार मेळावा २१ फेब्रुवारी ते २६ मे २०२३ या दरम्यान नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएएसडीसी) यांच्या मार्फत आयोजीत करण्यात आला आहे.

या मेळाव्यामध्ये एनएसडीसी या डिजीटल प्लॅटफॉर्मवर विद्यार्थी आणि नियोक्ते यांची नोंदणी करिता २१ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२३ तर स्क्रिनिंग आणि भाषा चाचणी ऑनलाईन करिता २० ते २७ मार्च २०२३ या कालावधीत करायची आहे. उमेदवार ऑनलाईन मॅपिंग २८ मार्च ते १० एप्रिल २०२३ पर्यंत तर भारतातील विविध शहरामध्ये प्राथमिक फेऱ्या ११ एप्रिल ते १५ मे २०२३ पर्यंत तर समारोप समारंभ २६ मे २०२३ या कालावधीत राहील.

सदर जॉब फेअर मध्ये उमेदवारांनी सहभागी होण्यासाठी https://www.kaushalmahotsav.nsdcdigital.org/International/Candidate/ लिंकवर तर विविध कंपन्या/उद्योजकांनी सहभागी होण्यासाठी https://www.kaushalmahotsav.nsdcdigital.org/International/Company/ लिंकवर नोंदणी करावयाची आहे.

वरील टाईमलाईननुसार जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी आंतरराष्ट्रीय रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन सहायक आयुक्त सुधाकर झळके यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास व रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हा क्रीडा संकुल यांच्याशी ०७१८४-२५२२५० यावर संपर्क साधावा.





  Print






News - Bhandara




Related Photos