महत्वाच्या बातम्या

 शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना रस्ता रोको आंदोलन : शिक्षक संघाचा विद्यार्थ्यांना फटका


- सिंदेवाही तालुक्यातील लाड़बोरी येथील घटना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / सिंदेवाही : महाराष्ट्र शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, महाराष्ट्र येथील राज्य शिक्षक कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्यातील १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त कर्मचाऱ्याना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करणे. या राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांनी १४ मार्च २०२३ पासून जुन्या पेंशन योजना सुरू करावी, याकरिता बेमुदत आंदोलन पुकारले आहे. मात्र या आंदोलनाचा सर्वात जास्त फटका शिक्षण विभागाला बसला आहे. या बेमुदत संपामुळे शिक्षक शिकवायला येत नसल्याने आणि मागे कोरोना काळात २ वर्ष वाया गेल्याने सर्व विद्यार्थीसोबत होते.

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी गावातील जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षक शाळेत शिकविण्याकरिता यावे. याकरीता आज सकाळी १६ मार्च २०२३ ला मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केला.

सकाळपासून विद्यार्थ्यांनी सिंदेवाही- नवरगाव रस्ता ठप करुण ठेवला होता. सदर माहिती प्रशासकिय अधिकारी यांना होताच, लगेच त्या ठिकाणी हजर होऊन, जि. प .शाळेतील विद्यार्थ्यांचे समजूत काढून २ शिक्षकांची व्यवस्था केली आहे. शेवटी विद्यार्थ्यांनी रास्ता मोकळा करुण दिला आणि आंदोलन मागे घेतले.





  Print






News - Chandrapur




Related Photos