महत्वाच्या बातम्या

 अष्टभुजा वॉर्ड येथील गाळे सील १६ ते २६ मार्च दरम्यान शास्तीत ५० टक्के सूट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : ७२,३६१ रुपयांची थकबाकी असणाऱ्या अष्टभुजा वॉर्ड येथील निलरतन शहा यांच्या मालकीच्या निर्मल जिम आणि वॉटर कॅन सेंटर या गाळ्याला मनपा कर वसुली पथकाने टाळे ठोकले आहे. मनपा कर विभागाद्वारे वारंवार सूचना देऊनही सदर मालमत्ता धारकाने कराचा भरणा न केल्याने सदर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान १०० टक्के शास्ती माफीची मुदत १५ मार्च रोजी संपुष्टात आली असुन आता १६ ते २६ मार्च दरम्यान मालमत्ता कराच्या शास्तीत ५० टक्के सूट मिळणार आहे.        

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कर वसुलीसाठी झोननिहाय विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी मनपा अधिकारी कर्मचारी यांची १२ पथके गठीत करण्यात आली असुन मालमत्ता कर वसुली हे मनपाच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत असल्याने महापालिकेने थकीत तसेच चालु आर्थिक वर्षातील मालमत्ता कर वसुलीकडे लक्ष केंद्रित केले आहे. थकीत कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्ता धारकांच्या मालमत्तेला सिल लावण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरु आहे. काही मालमत्ता धारक हे धनादेशाद्वारे कराचा भरणा करतात, अधिकतम धनादेश हे वटले जातात, मात्र जे धनादेश वटले जाणार नाही त्यांच्यावर फौजदारी कारवाई मनपातर्फे करण्यात येणार आहे.    

सदर कारवाई ६ मार्च रोजी मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात व उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सहायक आयुक्त विद्या पाटील, नरेंद्र बोभाटे, सचिन माकोडे, राहुल पंचबुद्धे, कर विभाग प्रमुख अनिल घुले, अग्निशमन विभाग प्रमुख चैतन्य चोरे, पथक प्रमुख नागेश नित, नरेंद्र पवार, अमित फुलझेले, चिन्मय देशपांडे, अमुल भुते, प्रगती भुरे, अतुल भसारकर, रवींद्र कळंबे, सोनू थुल, प्रतीक्षा जनबंधु, अतुल टिकले, सागर सिडाम, विकास दानव, चॅनल वाकडे, प्रविण हजारे यांनी केली.





  Print






News - Chandrapur




Related Photos