बलात्कार पीडिताची ओळख कुठल्याही स्वरुपात देऊ नका : सुप्रीम कोर्ट


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  लैंगिक अत्याचार करुन प्राणघातक हल्ला झालेल्या कुठल्याही पीडिताची ओळख उघड करता येऊ नये, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने माध्यमांना सुनावले आहे. मृतदेहाची देखील प्रतिष्ठा असते असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
बलात्कार पीडिताच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी बलात्काराच्या प्रकरणांमध्ये पोलिसांत नोंदवण्यात आलेली एफआयआरची प्रत देखील माध्यमांनी प्रसिद्ध करु नये, असेही कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
बलात्कार पीडित जर अल्पवयीन असेल तर अशा व्यक्तीची ओळख कोणत्याही परिस्थितीत उघड करु नये, भलेही यासाठी पीडिताच्या नातेवाईकांची परवानगी असो. तसेच लैंगिक प्रकरणांमधील पीडितांची नावे सार्वजनिक सभा किंवा सोशल मीडियामध्ये देखील घेता कामा नये, अशी समजही कोर्टाने दिली आहे.  Print


News - World | Posted : 2018-12-11


Related Photos