महत्वाच्या बातम्या

 आम आदमी पार्टी बल्लारपूरचा जुनी पेन्शन योजना आंदोलनला पाठिंबा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू ठेवावी यासाठी आंदोलन करीत आहेत. १४ मार्च २०२३ पासून सरकारी कर्मचाऱ्यांचे संघटनानी आपल्या मागणीसाठी संपावर गेले आहेत. त्यांना स्थानीय आम आदमी पार्टीने पाठिंबा दिला आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्ष सत्तेत येताच सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा ठराव मंजूर केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा पंजाब सरकारच्या या निर्णयाचे कौतुक केले होते. २००५  नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवी राष्ट्रीय निवृत्तीवेतन पद्धती लागू करण्यात आलीय.

या योजने अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापलेली काही रक्कम शेअर बाजारात गुंतवली जाते. त्यामुळे निवृत्तीपश्चात मिळू शकणारा लाभ हा त्या त्या वेळेच्या बाजार स्थितीनुरूप असेल. अर्थात शेअर बाजारातील सरकारी गुंतवणुकीची कशी वाट लागते याचा अनुभव देशाने अनेकदा घेतला आहे. या इतर अनेक कारणांमुळे शासकीय कर्मचाऱ्यांकडून नव्या पेन्शन योजनेला विरोध दिवसेंदिवस तीव्र होत आहे. जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी महारष्ट्र मध्ये ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. आज 16 मार्च रोजी आम आदमी पार्टीचा बल्लारपूर शहरातील सरकारी कर्मचाऱ्यांना तहसील कार्यालय परिसरात भेटून त्यांना पूर्ण पाठींबा देण्यात आला आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos