महत्वाच्या बातम्या

 गोवंश तस्करी रोखण्यात सावली पोलिसांना यश


- गोवंशसह ३ लाख ८० हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त
विदर्भ न्युज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सावली : तालुक्यातील मुख्य मार्गावरून होत असलेल्या १७ ऑक्टोबरला अवैध गोवंश वाहतूकबाबत सावली पोलिसांना माहिती मिळाली. त्या मिळालेल्या माहितीच्या आधारे सकाळी ९.३० च्या सुमारास खेडी फाटा येथे सावली पोलिसांनी नाकाबंदी केली असता वाहन क्र. एम एच ३४ एबी ७६५३ हे महिंद्रा पीक अप वाहनामध्ये एकूण ८ गोवंश जनावरे अवैधरित्या वाहतूक करतांना मिळून आले. जप्त केलेल्या गोवंश जनावरे ही गो शाळेत दाखल करून आरोपी अरुण बाबुराव निकोडे (५०), संगम विनोद कोल्हटकर(१९) वर्ष दोन्ही रा. टेकाडी ता. मुल यांचेवर अप क्रं २२८/२२ महा. पशू संरक्षण अधि. कलम ५ ए ,५ बि, प्राणी छळ प्रति. अधि. कलम ११ (१) डि. एफ. महा.पोलीस अधि. कलम ११९, मो. वा. का कलम ८३/१७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मिळून आलेले वाहनची किंमत ३ लाख रू व जनावरे किंमत ८० हजार रु. असा एकूण ३ लाख ८० हजार रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, आशिष बोरकर, ठाणेदार सावली यांचे मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल दर्शन लाटकर, विशाल दुर्योधन, धीरज पिदुरकर यांनी केली आहे. 





  Print






News - Chandrapur




Related Photos