महत्वाच्या बातम्या

 समाजकार्य महाविद्यालय तर्फे पथनाट्यच्या माध्यमातून जनजागृती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत येणारे श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित, फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क गडचिरोली येथील बि. एस. डब्ल्यू. भाग २ सेमीस्टर ४ मधील विद्यार्थ्यानी क्षेत्रकार्या दरम्यान गडचिरोली येथील विवेकानंद नगर येथे व्यसन आणि व्यसनामुळे कुटुंबावर होणारे परिणाम तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयी पथनाट्यचे आयोजन करण्यात आले. 

यावेळी समुदायातील प्रतिष्ठित नागरिक संजय बोरसरे, सुरेश चिंचोलकर, बाळकृष्ण बांबोळे सेवानिवृत्त B.D.O, वेणूताई खोब्रागडे अगंनवाडी सेविका, उज्वला चव्हाण आशा वर्कर, लता लाटकर माजी सभापती, रजनी मेश्राम, साक्षी चिंचोलकर, प्रदीप बोरसरे, मुनिता खोब्रागडे, रामदास गुरूनुले, उपस्थित होते. तसेच समुदायातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रा. दीपक तायडे आणि क्षेत्रकार्य मार्गदर्शक प्रा. हितेश चरडे व प्रा. सुरेश कंती यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत सदर पथनाट्य पार पडले.

तसेच बी. एस. डब्ल्यु भाग २ मधील प्रवीण टेकाम, चिराग पोरेडीवार, शिवानी बैरागी, अंजली वेलादी, शिवानी एम गोटा, शिवानी बी गोटा, मनीषा मंडल, निकिता वाघरे यांच्या सहभागातून कार्यक्रम पार पडले. आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यसन आणि व्यसनामुळे कुटुंबावर होणारे दुषपरिणाम तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ याबाबत समुदायात संदेश पोहचून जनजागृती करण्यात आली. यावेळी समुदायातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होती.





  Print






News - Gadchiroli




Related Photos