महत्वाच्या बातम्या

 जि. प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते व्येंकटापूर येथील शाळेतील नवीन वर्ग खोलीचा लोकार्पण सोहळा संपन्न 


- ग्रामपंचायत आवलमरी अंतर्गत व्येंकटापूर येथे जिल्हा परिषद शाळेत नवीन वर्ग खोलीचा लोकार्पण सोहळा संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी : जिल्हा परिषद गडचिरोली पंचायत समिती अहेरी अंतर्गत व्येंकटापूर येथे जिल्हा परिषद शाळा असून इयत्ता १ ली ते ४ थी पर्यत शिक्षण असून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या शाळेची वर्ग खोलीची कमतरता असल्याने विद्यार्थ्याना शिक्षण घेण्यासाठी अडचण होत होती. माजी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे मागणी केली. जिल्हा परिषदचे अध्यक्ष असताना जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत सदर वर्ग खोली मंजूर करून भूमिपूजन करण्यात आले होते. 

शाळेचे बांदकाम पूर्णत्वास आल्या मुळे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सदर लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आवलमरी ग्रामपंचायतचे सरपंच सौ. सुनंदा कोडापे उपस्थित होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित कुकलारे (PSI) आवलमरी, वैकना कोडापे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष, चिरंजीव चिलवेलवार उपसरपंच आवलमरी, मारोती मडावी ग्रामपंचायत  सदस्य, विमलाबाई छटारे, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, ग्रामपंचायत सदस्य, जेगय्या परकीवार, नाना मुरमाडे, द्रुपद मुरमाडे, दामोदर मुरमाडे, वासुदेव सिडाम, धनंजय सुनतकर, प्रकाश दुर्गे, राकेश सडमेक तसेच गावातील महीला पुरुष उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos