महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


१६ मार्च महत्वाच्या घटना

१५२१ : फर्डिनांड मॅगेलन जगप्रदक्षिणा करीत फिलिपाईन्सला पोहोचला.

१५२८ : फत्तेपूर सिक्री येथे राणा संग आणि बाबर यांच्यात युद्ध होऊन राणा संग यांचा पराभव झाला.

१६४९ : शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी शहजादा मुराद शहाजहानचा मुलगा यास पत्र लिहीले.

१९१९ : भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ठराव गोपाळकृष्ण गोखले यांनी मांडला.

१९३६ : महाड येथील चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा दलितांना हक्क असण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला.

१९४३ : प्रभात चा नई कहानी हा चित्रपट रिलीज झाला.

१९४५ : दुसरे महायुद्ध - रॉयल एअर फोर्सने तुफानी बॉम्बफेक करून जर्मनीच्या बुर्झबर्ग शहराचा २० मिनीटांत विनाश केला.

१९६६ : अमल कुमार सरकार यांनी भारताचे ८ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.

१९७६ : इंग्लंडचे पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांनी राजीनामा दिला.

२००० : भारतीय हॉकीपटू धनराज पिल्ले आणि मध्य अंतराची धावपटू ज्योतिमय सिकदर यांना के. के. बिर्ला पुरस्कार जाहीर केला.

२००१ : नेल्सन मंडेला यांना गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला.

१९५५ : राष्ट्रीय लसीकरण दिवस

१६ मार्च जन्म

१६९३ : इंदूर राज्याचे संस्थापक मल्हारराव होळकर यांचा जन्म. (मृत्यू : २० मे १७६६)

१७५० : जर्मन-ब्रिटीश खगोलशास्त्रज्ञ कॅरोलिना हर्षेल यांचा जन्म. (मृत्यू : ९ जानेवारी १८४८)

१७५१ : अमेरिकेचे ४थे राष्ट्राध्यक्ष जेम्स मॅडिसन यांचा जन्म (मृत्यू : २८ जून १८३६)

१७८९ : जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज ओहम यांचा जन्म. (मृत्यू : ६ जुलै १८५४)

१९०१ : भारताचे ७वे सरन्यायाधीश, पद्मविभूषण प्र. बा. गजेंद्रगडकर यांचा जन्म. (मृत्यू : १२ जून १९८१)

१९१० : ८वे पतौडी नवाब इफ्तिखार अली खान पतौडी यांचा जन्म. (मृत्यू : ५ जानेवारी १९५२)

१९२१ : सौदी अरेबियाचे राजा फहाद यांचा जन्म. (मृत्यू : १ ऑगस्ट २००८)

१९३६ : संगीतकार भास्कर चंदावरकर यांचा जन्म

१९३६ : चित्रकार आणि कोरा कॅनव्हास चे लेखक प्रभाकर बर्वे यांचा जन्म.

१९३६ : एम.आर.आय. चे शोधक रेमंड वहान दमडी अन यांचा जन्म.

१६ मार्च मृत्यू

१९४५ : भिनव भारत संघटनेचे संस्थापक गणेश दामोदर उपाख्य बाबाराव सावरकर उर्फ ग. दा. सावरकर यांचे निधन (जन्म : १३ जून १८७९)

१९४६ : जयपूर अत्रोली घराण्याचे गायक उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचे मुंबई येथे निधन. (जन्म : १० ऑगस्ट १८५५)

१९९० : संत वाङ्मयाचे अभ्यासक आणि रोहयोचे जनक वि.स. पागे यांचे निधन. (जन्म : २९ जुलै १९१०)

२००७ : बांगला देशचा क्रिकेटपटू मंजुरूल इस्लाम यांचे निधन. (जन्म : ४ मे १९८४)





  Print






News - todayspecialdays




Related Photos