तेंदुपत्ता संकलनासाठी देऊ केलेले पैसे नक्षल्यांना न मिळाल्यानेच पुडो यांची हत्या !


- पोलिस खबरी नसल्याची मिळाली माहिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कुरखेडा :
नक्षल्यांनी तालुक्यातील खोब्रामेंढा येथील अंताराम पुडो यांची निर्घृन हत्या केली. पोलिस खबरी असल्याच्या संशयाने हत्या केल्याचे बोलल्या जात आहे. मात्र अंताराम पुडो हे तेंदुपत्ता कंत्राटदाराकडे मॅनेजरचे काम करीत होता. तेंदुपत्ता संकलनासाठी नक्षल्यांना देऊ केलेली रक्कम मिळाली नाही, यातूनच त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.
खोब्रामेंढा गावापासून एक ते दीड किमी अंतरावर पुडो यांची हत्या करण्यात आली. नक्षल्यांनी प्रेताजवळ पत्रके टाकून पोलिस खबरी असल्याचे म्हटले आहे. कुरखेडा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेले खोब्रामेंढा हे गाव अतिशय संवेदनशिल भाग म्हणून ओळखले जाते. या भागात नक्षल्यांचा वावर आहे. २ डिसेंबर ते ८ डिसेंबरपर्यंत नक्षल्यांनी बंद पुकारल होता. सप्ताह संपताच नक्षल्यांनी हत्या केली आहे. 
खंडणी गोळा करण्यासाठी अनेक निष्पाप आदिवासींना पोलिस खबरी ठरवून हत्या केल्या जात आहेत. आदिवासी जनता नक्षल्यांना थारा देत नसल्याने तसेच नक्षल्यांचा फोलपणा दिसून आल्याने आदिवासींना लक्ष्य करण्याचे धोरण नक्षल्यांनी अवलंबिले आहे. अशा आणखी किती निष्पापांचा बळी घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-10


Related Photos