महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली पोलीस दलातील मृत जवानांच्या कुटूंबियांना अँक्सिस बँकेने दिला मदतीचा हात 


- पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते १० लाख रुपयाचा धनादेश कुटुंबियांच्या स्वाधीन 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : बँक म्हणजे ग्राहकांचे पैसे सांभाळणारी किंवा त्यांना कर्ज देणारी यंत्रणा अशी नागरीकांमध्ये ओळख असुन एक पाऊल पुढे जात आपल्या खातेधारकांच्या जिवाला धोका निर्माण झाला तर त्यांच्या कुटुंबियांना आर्थीक आधार देण्याचा नवा आदर्श अँक्सिस बँकेने ठेवला आहे. १५ ऑक्टोंबर २०१२ रोजी गडचिरोली पोलीस दलातील कार्यरत कर्मचारी शामराव वैरागडे हे कर्तव्यावर असतांना त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.

त्यामुळे त्यांच्या कुटुंबियावर मोठे संकट कोसळले. ही समस्या ओळखून अँक्सिस बँकेने मदतीचा हात पुढे करीत त्यांच्या पश्चात पत्नी छाया शामराव वैरागडे यांना आर्थीक मदत स्वरुपात पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते १० लाख रुपयाचा धनादेश अदा करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिता तसेच अँक्सिस बँकेचे शाखा व्यवस्थापक राकेश राजेंद्र वल्लालवार यांच्या उपस्थितीत मृत कर्मचा-यांच्या कुटुंबियांना धनादेश स्वाधीन करण्यात आला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos