अवकाळी पावसामुळे ‘कही खुशी कही गम’


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / चिमूर :
गेल्या आठ दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे रब्बीच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता असून ‘कही खुशी कही गम’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. 
आज सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस पावसाने भिजल्यामुळे त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वी ढगाळ वातावरणामुळे तसेच धुक्क्यांमुळे रब्बी पिके फुलावर असतानाच फुले गळायला लागली. यामुळे रब्बी पिकांचे नुसार होणार अशी भिती शेतकरी वर्गात निर्माण झाली होती. परंतू पावसामुळे गहू, हरभरा, जवस, मुंग, तूर या पिकांना काहीसा फायदा होणार अशी अपेक्षा शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे. तर बऱ्याच शेतकऱ्यांचा कापूस काढणीला आला असतांनाच पाउस आल्याने कापूस ओला होवून जमिनीवर गळला.  यामुळे मातीमोल झाला असल्याचे दिसून येत आहे. कापूस पिकाला एक ते दीड महिन्याआधी पावसाची अत्यंत आवश्यकता होती. परंतु दोन महिन्यांपासून पाउस बेपत्ता झाल्याने कापसाचे उत्पादन घटले आहे. त्यातच अवकाळी पावसाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. 

   Print


News - Chandrapur | Posted : 2018-12-10


Related Photos