महत्वाच्या बातम्या

 बंदुकीचा धाक दाखवून युवा व्यावसायिकाला व्याजाच्या रकमेची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर शहरातील एका युवा व्यावसायिकाला बंदूकचे धाक दाखवून व्याजाच्या रकमेची मागणी केली.

प्राप्त महितीनुसार शहरातील लाकूड व्यावसायिक संतोष राखुंडे यांनी चार वर्षांपूर्वी महिंद्रा जंजर्ला यांच्याकडून ३८ लाख रुपये कर्ज घेतले होते. त्यापैकी २८ लाख रुपये महिंद्रा जंजर्ला याला राखुंडे यांनी बँक व ऑनलाईन द्वारे दिले होते. तसेच १० लाख रुपये रोख दिले. पूर्ण रक्कम दिल्यानंतर ही महेन्द्र जंजर्ला याने ३८ लाख रुपयांवर १२ टक्के दराने ९१ लाख रुपये व्याजाची वारंवार मागणी सुरू केले. त्या संबंधाने ४ मार्च रोजी महेंद्र जंजर्ला यांनी संतोष राखुंडे यांना राजुरा बसस्थानका जवळ बोलावले होते. संतोष आपल्या कार ने तिथे पोहोचला. तिथेच कार व चालकला सोडून सतीश बहुरियाची हुंडाई कार मध्ये बसून कोर्टा जवळ असलेल्या बिअर शॉप जवळ पोहचला. तिथे त्याची भेट महिंद्रा जंजर्ला सोबत झाली.

संभाषणात कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून संतोष राखुंडे यांचा मोबाईल बंद केला आणि बिअर शॉपीमध्ये एका मुला जवळ देऊन त्याच हुंडाई कारने वरूर गाव शेजारी असलेल्या भुरकुंडा गावात जाऊन थांबले. तेथे दोन तरुण बोलेरो कार मधून उतरून आले व एका युवकाने संतोष राखुंडे यांच्या कानपटित बंदूक लावून महेन्द्र जंजर्ला यांचे व्याज सहित रकमेची मागणी केले तसेच मारहाण केले. त्याच दिवशी ते तेथून परतल्या नंतर महेंद्र जंजर्ला व इतराविरुद्ध बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केले.

बल्लारपूर पोलिसांनी तपास चक्र फिरवून १३ मार्च रोजी महेंद्र पंतय्या जंजर्ला (४८) रा. सस्ती टाउनशिप राजुरा, सतीश रामभरोसे बहुरिया (४१) रा. सुभाष वार्ड, बल्लारपूर, चंदन विमल प्रसाद सिंग ठाकूर (३३) रा. बिबिया गाव, जि. प्रतापगढ (उत्तर प्रदेश) ह.मु. राजुरा, सतेंद्रकुमार उर्फ गुड्डू परमहंस (३०) रा. शिताब दियारा, छपरा जि. छपरा (बिहार) ह.मु. राजुरा यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos