महत्वाच्या बातम्या

 राजुरा शहरात आनंद विहार यात्रेचे आगमन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : श्रद्धा, भक्ती आणि विश्वास हे तीन शब्द तुम्हाला यशाची पायरी चढायच शिकवते. उत्तम भविष्यासाठी सतत प्रयत्न करा. धर्मावर नेहमी विश्वास ठेवा. वर्तमानात विश्वास कमी होत आहे. पालकांनी दिलेल्या मोबाईलवर मुले फिंगर प्रिंट व पिन लॉक लावले जात आहे. पालक आणि मुलांमध्ये विश्वास कमी होत आहे. असे विश्वास कमी होत गेले तर विश्वास कसे वाढेल. त्यामुळे श्रद्धा, भक्ती आणि विश्वास हे तीन शब्द यशाचे मुळ मंत्र आहे. असे प्रतिपादन राष्ट्रसंत परमपूज्य जैन मुनी आचार्य आनंद ऋषी यांचे शिष्य श्रमन संघीय युवाचार्य प्रवर पूज्य महेन्द्र ऋषी यांनी राजुरा येथे केले.

राजुरा येथील संकटमोचन हनुमान मंदिर मध्ये युवाचार्य प्रवर पूज्य महेन्द्र ऋषी, हितेंद्र ऋषी तसेच धवल ऋषी यांचे आगमन झाले. आज सकाळी त्यांचे प्रवचन झाले. 

यावेळी राजेंद्रप्रसाद झंवर, राधेश्याम सोनी, लक्ष्मीनारायण अडानिया, नारायणप्रसाद झंवर, नंदाराम त्रिवेदी, समाजाचे संदीप जैन, प्रशांत गोठी, शांतादेवी झंवर, रंभादेवी गोठी, कमलादेवी अडानिया, पदमा शर्मा तसेच समाजाचे पुरुष व महिला उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos