शौचालयासाठी गेला अन दुकानदार वाघाची शिकार झाला : रामदेगी येथील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
 प्रतिनिधी / खडसंगी 
: एका दुकानात नोकर असलेला इसम सकाळी शौचालयासाठी गेला असता दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढवून ठार केल्याची धक्कादायक घटना ताडोबा अंधारी व्याग्र प्रकल्प बफर क्षेत्रातील खडसंगी वनपरिक्षेत्रातील रामदेगी पर्यटन स्थळी  आज सकाळी घडली.  संदीप तितरे (३८)  असे मृत व्यक्तीचे नाव आहे . 
खडसंगी येथून ५ किलोमीटर अंतरावर रामदेगी तिर्थस्थळ असून येथे डिसेंबर महिन्यातील प्रत्येक सोमवारला यात्रा भरत असते. या रामदेगी तिर्थस्थळ ठिकाणी काही खेळ साहित्य दुकानाची मुक्काम ठोकून बसलेले अनेक वर्षांपासून दुकाने थाटली आहेत.  मात्र इतक्या वर्षांनंतर दुकानदाराला मारल्याची हि पहिलीच घटना रामदेगी येथील कंपार्टमेंट नंबर ६० मध्ये घडली आहे. 
मृतक संदीप तितरे हा पर्यटनस्थळी असलेल्या एका दुकानात काम करीत होता. मागील अनेक दिवसांपासून या परिसरात वाघाचा वावर आहे व वाघ या परिसरात नेहमीच येणे जाणे करत असतो.  अशातच दबा धरून बसलेल्या वाघाने थेट शौचालयासाठी गेलेल्या संदीप वर अचानक हल्ला चढविला या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले.  रामदेगी पर्यटन स्थळ असल्याने लहान बालकापासून ते वयोवृद्ध लोक या पर्यटन स्थळी येत असल्याने लहान बालक इकडे तिकडे फिरत असतात मौजमजा करीत असतात व सद्या रामदेगी येथे यात्रा सुरु असून अनेक भाविक लोक येत असतात अशा पर्यटन स्थळी वाघ वावर करीत असेल तर वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी रेटून धरली आहे . वनपरिक्षेत्र खडसंगी बफर अंतर्गत येत असून येथील वनरक्षक गस्त टाकीत नसल्याने सदर घटना घडली असे व्यावसायिक बोलत होते.  मात्र जो पर्यंत तात्काळ मदत मिळत नाही.  तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही. असा काही काळ व्यावसायिकांनी मागणी रेटून धरल्याने तणाव निर्माण झाला होता.  या घटनेचा पुढील तपास शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार करीत आहेत.  Print


News - Chandrapur | Posted : 2018-12-10


Related Photos