नक्षल्यांनी गळा चिरून इसमाची केली निर्घृण हत्या : कुरखेडा तालुक्यातील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कुरखेडा :
  नक्षल्यांनी धारदार शस्त्राने इसमाची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची घटना कुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंढा येथे आज १० डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. अंताराम पुडो (५५) रा. खोब्रामेंढा असे हत्या केलेल्या इसमाचे नाव आहे . 
प्राप्त माहितीनुसार, मृतक तेंदू फळीवर व्यवस्थापक म्हणून काम बघत होता. आज सकाळी खोब्रामेंढा देवस्थानानजीक टी पाईंटजवळ पुढोचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेने भीतीमय वातावरण पसरले आहे . या घटनेचा तपास मालेवाडा पोलीस करीत असून अंताराम पुडो यांच्या हत्येमागचा कारण अद्याप कळू शकला नाही . 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-10


Related Photos