महत्वाच्या बातम्या

 अधिवेशनात खासदार अशोक नेते यांनी तीर्थक्षेत्रांकडे वेधले लक्ष


- चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा, गोंदिया जिल्हातील कचारगड, चिमुर तालुक्यातील रामदेगी यांचा सहभाग 

- तीर्थक्षेत्रांतील स्थळानां पायाभूत सोयी सुविधा, पर्यटन विकास उपलब्ध होण्याकरिता

- अधिवेशनात ३७७ अन्वये मागणी करून प्रस्ताव केले सादर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : मार्कंडा देवस्थान हे महाराष्ट्र राज्याच्या गडचिरोली चिमूर लोकसभा मतदार संघातील चामोर्शी तालुक्यातील एक फार मोठे धार्मिक स्थळ असून ते काशी देवस्थान म्हणूनही प्रसिद्ध आहे. या धार्मिक स्थळाला खूप महत्व असून या मंदिराजवळून पवित्र नदि वैनगंगा  जाते. वेनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या पवित्र मार्कंडा (देव) येथे मार्कडेय ऋषींच्या तपश्चर्येने पावन झालेले भगवान शंकराचे हेमाडपंती मंदिर आहे. या ठिकाणाला विदर्भाची काशी असेही म्हणतात. केवळ महाराष्ट्र राज्यातूनच नव्हे तर देशाच्या इतर भागातूनही मोठ्या संख्येने भाविक येतात आणि महाशिवरात्री उत्सवाला येथे येणाऱ्या भाविकांची संख्या सुमारे १५ ते २० लाख असते. पुराणातही या धार्मिक स्थळाचे महत्त्व सांगितले आहे. मात्र येथील भाविकांसाठी अत्यावश्यक मुलभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे.

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघा अंतर्गत कचरगड, तालुका सालेकसा, जिल्हा गोंदिया येथे आदिवासींचे आराध्य दैवत असलेल्या लिंगोजंगोची एक प्रमुख आणि अतिशय प्राचीन लेणी व मंदिर आहे. हे देशातील आदिवासींसाठी एक प्रमुख धार्मिक स्थळ असून डोंगराळ प्रदेशात वसलेले असून दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात विशेष उत्सवादरम्यान सुमारे ४० ते ५० वर्षांच्या प्राचीन गुहा मंदिराला भेट देणाऱ्या आदिवासी भाविकांची संख्या आहे.

तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात रामदेगी हे पवित्र तीर्थक्षेत्र व रामाचे मंदिर आहे. पौष (जानेवारी) महिन्यात तीर्थयात्रा भरते व आजूबाजूच्या भागातील भाविक मोठ्या संख्येने धार्मिक यात्रेसाठी येतात.

त्यामुळे केंद्र सरकारला विनंती करतो की, आदिवासी बहुसंख्य भागात असलेल्या उपरोक्त सर्व धार्मिक स्थळांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांचा केंद्रीय पर्यटनाच्या यादीत समावेश करून त्या सर्वांचा विकास व सुशोभीकरण या स्वरुपात करावे. पर्यटनाच्या दृष्टीने रस्त्यांची दुरुस्ती, मजबुतीकरण, काँक्रिटीकरण, स्वच्छतागृहे, धर्मशाळा/ सांस्कृतिक इमारती, आदिवासींच्या कला-गुणांचा विकास आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी वाटप करण्याचा प्रयत्न करण्यात यावे, याकरिता खासदार अशोक नेते यांनी दिल्ली येथे सुरू असलेल्या अधिवेशनात ३७७ अन्वये मागणी करून प्रस्ताव सादर केले.





  Print






News - Rajy




Related Photos