महत्वाच्या बातम्या

 तरुणांनी नाविण्यपूर्ण संकल्पनांचा उपयोग करुन उद्योग निर्मितीकडे वळावे : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


- स्टार्टअप सादरीकरणाव्दारे संकल्पनांची निवड
- स्टार्टअप यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचे सादरीकरण
विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : तरुणांनी नाविण्यपूर्ण संकल्पनांचा उपयोग करुन उद्योग निर्मिती करावी व जिद्दीने या क्षेत्रात वाटचाल करुन जास्तीत जास्त नवउद्योजक घडवावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
कौशल्य विकास विभागाच्यावतीने यशवंत महाविद्यालय येथे स्टार्टअप यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर देशमुख, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रदिप घुले, यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य रविंद्र बेले, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त निता औघड, इंडियन टेक्निकल रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट नागपूरचे सदस्य सचिव केतन मोहितकर, एमआयडीसी असोशियनचे अध्यक्ष व उद्योजक प्रविण हिवरे उपस्थित होते.
शासनाकडून नवउद्योजकांना आर्थिक सहाय्य मिळावे, असे समीर देशमुख म्हणाले. प्रत्येक व्यक्तीमध्ये नवउद्योग निर्मितीची क्षमता असते. परंतु त्यांना व्यासपिठ मिळणे आवश्यक असते. या स्टार्टअप उपक्रमातून नव उद्योगांच्या संकल्पनाला वाव मिळेल, असे प्रदीप घुले यांनी सांगितले. मराठी माणसाला उद्योजकतेच्या नकारात्मक विचारातून बाहेर काढायचे असेल तर वारंवार अशा प्रकारच्या उपक्रमांची नितांत आवश्यकता आहे, असे केतन मोहितकर म्हणाले. नवीन उमेदवारांना नोकरी न मिळाल्याने नाराज न होता स्वत:चा व्यवसाय किंवा उद्योग उभा करावा व जिवनात यशस्वी व्हावे, असे प्रविण हिवरे म्हणाले.
स्टार्टअप सादरीकरण कार्यक्रमासाठी परिक्षण समितीमध्ये परीक्षक म्हणुन प्रा. प्रफुल खोब्रागडे, प्रा. अनुराग लोहारिया, शहजाद शेख, प्रा. कैलास जैतवार, प्राचार्य देवानंद गायधनी, डॉ. जिवन कतोरे, नाबार्डचे सुशांत पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी संपूर्ण सादरीकरण झाल्यानंतर परिक्षकांनी सहभागी झालेल्या उमेदवारांचे मुल्यमापन करुन उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या वाघेडा एफपीओ ग्रुपतर्फे प्रताप मंगरुळकर यांना प्रथम, अक्षय मोहकर व्दितीय तर खुशी देऊळकर यांना तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी बक्षिस समारंभाला उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, उपजिल्हाधिकारी नितीन पाटील, विविध शासकीय आयटीआयचे प्राचार्य उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी रुपसिंग ठाकुर, एमजिएमचे फेलो रुपेश रामगडे, डिएसडीसीचे धिरज मनवर, अण्णासाहेब पाटील आर्थिक विमास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सागर आंबेकर, यशवंत महाविद्यालयाचे डॉ. धोटे, व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.





  Print






News - Wardha




Related Photos