महत्वाच्या बातम्या

 उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लायसन्स कॅम्प आयोजित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जिल्ह्यांतर्गत लायसन्स कॅम्प आयोजित करण्यात येत आहे. सदर कॅम्पमध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती पूर्वनियोजित ऑनलाइन अपॉइंटमेंट नुसार देण्यात येणार आहेत. तरी, जिल्ह्यातील नागरिकांनी उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे.

शिबिराची स्थळे :

२३ मार्च २०२३ रोजी आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा, २४ मार्च रोजी शासकीय विश्रामगृह, चिमूर, २७ मार्च  रोजी एन.एच. महाविद्यालय ब्रह्मपुरी, २८ मार्च रोजी शासकीय विश्रामगृह, गोंडपिपरी तर २९ मार्च रोजी शरद पवार महाविद्यालय, गडचांदुर या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos