महत्वाच्या बातम्या

 महिला आयकॉन अग्रणी स्वच्छता पुरस्काराचे आयोजन


- मनपात करता येणार पात्र व्यक्ती / संस्था यांना अर्ज शहर स्वच्छतेत महिलांचा सहभाग होणार अधोरेखित 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालयातर्फे स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी अंतर्गत महिला आयकॉन अग्रणी स्वच्छता पुरस्कार - २०२३ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन यात स्वच्छता विषयक विशेष कार्य करणाऱ्या महिलांना पुरस्काराने सन्मानीत केले जाणार आहे. शासन निर्देशानुसार ०७ मार्च २०२३ ते १५ मार्च २०२३ या कालावधीत महिलांचा स्वच्छते मधील सहभाग व त्यांचे स्वच्छतेमधील नेतृत्व वृद्धिंगत करण्यासाठी स्वच्छोत्सव - २०२३ अभियान राबविण्यात येणार असुन त्याअंतर्गत सदर पुरस्कार दिला जाणार आहे.

८ मार्च अंतरराष्ट्रीय महिला दिनी मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला असुन ३ आठवड्याच्या या स्वच्छोत्सव - २०२३ नुसार कचरामुक्त शहरे प्रत्यक्षात आणण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व पार्श्वभूमीतील महिलांचा सन्मान करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. यात स्वच्छता जागृती फेरी व स्वच्छता शपथ घेणे,जागतिक शून्य कचरा दिन इत्यादी नागरीकांच्या सहकार्याने साजरा केले जाणार आहे.

या स्पर्धेत महिला उद्योजिका, स्वयंसेवी संस्था, स्टार्ट अप्स, स्वयं सहायता समुह, सुक्ष्म उद्योगी इत्यादी पात्र व्यक्ती / संस्था यांना सहभागी होता येणार असुन अर्ज करणाऱ्या पात्र व्यक्ती / संस्था यांनी सामुदायिक / सार्वजनिक शौचालयांचे व्यवस्थापन, सेप्टीक टॅंक स्वच्छता, वापरलेले पाणी / सेप्टीक यावर प्रक्रिया, घनकचरा संकलन आणि वाहतूक, MRF म्हणजेच मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी, वेस्ट टु वेल्थ प्रॉडक्ट्स, घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रणाली, माहीती -शिक्षण -संवाद, प्रशिक्षण, क्षमता विकास, तंत्रज्ञान आणि नाविन्यपुर्ण कार्य या क्षेत्रांमध्ये काम केलेले असावे.

यासाठी पात्र व्यक्ती / संस्था यांना १५ मार्च ते ५ एप्रिल २०२३ दरम्यान चंद्रपूर महानगरपालिका स्वच्छता विभागात अर्ज करता येणार आहे. ५ जुन जागतिक पर्यावरण दिनी सदर पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos