महत्वाच्या बातम्या

 समुद्रपूर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्यौगिक प्रशिक्षण संस्था, समुद्रपूरच्या संयुक्त विद्यमाने १७ मार्च रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था समुद्रपूर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात उत्पादन व सेवा क्षेत्रातील कंपन्या सहभागी होणार आहे. मेळाव्यास उमेदवारांनी कागदपत्राच्या झेरॉक्स प्रतीसह सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजता दरम्यान उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच शासनाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जाऊन रोजगार हा पर्याय निवडावा, नोकरी इच्छुक उमेदवारांनी लॉगइन या सेक्शनला जाऊन आपल्या सेवायोजन कार्डवरील नोंदणी क्रमांक व पासवर्ड टाकून लॉग इन करावे. तसेच पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा हा पर्याय निवडून जिल्हा वर्धा निवडावा व आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार कंपनीची निवड करून अर्ज करावे.

रोजगार मेळाव्यात आपले पासपोर्ट फोटो व सर्व शैक्षणिक कागदपत्रांची झेरॉक्स घेऊन जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्तांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तिसरा माळा, प्रशासकीय भवन, सिव्हील लाईन वर्धा येथे संपर्क साधावा.





  Print






News - Wardha




Related Photos