महत्वाच्या बातम्या

 बालाजी स्टडी सर्कल आणि NSPC चे प्राध्यापक शर्मा व किटे यांचा कैबिनेट मंत्री संजय राठौड यांनी केला सत्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : सत्र 2021-22 मधे जाहिर झालेल्या NEET, JEE-MAINS, JEE-Advanced, MH-CET व 12 वी स्टेट व CBSE बोर्ड च्या निकालात, शर्मा व किटे यांच्या योग्य मार्गदर्शनाने, गड़चिरोली च्या विद्यार्थियांनी बाजी मारली. याबद्द्ल कैबिनेट मंत्री संजय राठौड़ यांच्या हस्ते शर्मा व किटे यांचा सत्कार करण्यात आला.

गेल्या 22 वर्षापासून, Chemistry सारख्या विषयाचे योग्य मार्गदर्शन करित, शर्मा यांनी जिल्ह्यातील अनेक विद्यार्थियांना, देशातील नामांकित वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यात मोलाची भूमिका बजावली. शर्मा सारख्या अनुभवी शिक्षकांची समाजाला गरज आहे, असे मत कैबिनेट मंत्री संजय राठौड़ यांनी व्यक्त केले.

7वर्षा पूर्वी सुरु झालेल्या केद्रीय परीक्षा निट- JEE-MAIN आणि Advance हयात विद्यार्थियांना सर्वात अवघड़ विषय मनाला जणारा विषय म्हणजे Physics, पण नितेश किटे याच्या मार्गदर्शनाने आज गडचिरोली सारख्या दुर्गम भागातिल विद्यार्थी देशपांतळीवर आपला डंका बजावतो आहे. नितेश किटे यांच्यासारखा योग्य मार्गदर्शक जिल्ह्याला लाभल्याने, physics विषयाची भीति विद्यार्थियांच्या मनातून निघून गेली आहे. असे म्हणत संजय राठौड़ यांनी किटे सरांच्या कार्याची स्तुति केली.

याप्रसंगी कैबिनेट मंत्री संजय राठौड़, किरण पांडव, हेमंत जम्बेवार, राजू कावळे, व हजारों नागरिक उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos