महत्वाच्या बातम्या

 महिला दिनानिमित्य सद्भावना मंचाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : जागतिक महिला दिनानिमित्य जमाअत-ए-इस्लामी हिंद, महिला शाखा द्वारे सदभावना मंचाचे आयोजन आज १४ मार्च २०२३ ला दुपारी ०३:०० वाजता संतोषी माता वार्ड येथील अलहुदा मदरसा हॉल मध्ये करण्यात आले आहे. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सबिहा खान जिल्हा अध्यक्ष जमाते इस्लामी हिंद महिला शाखा नागपूर राहणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून स्नेहल रहाटे उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार बल्लारपूर राहणार आहेत. डॉ. अभिलाषा गावतुरे बालरोग तज्ञ व समाजसेविका, ॲड. प्रियंका चव्हाण, डॉ. अभिलाषा संगेकर कटके, मनीषा नैताम समाजसेविका, रेखा मेश्राम सामाजिक कार्यकर्त्या, शीतल विक्रम ताडे  सामाजिक कार्यकर्त्या, अंजली राजेंद्र भोसले अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड, संध्या राजेंद्र खाडे जिजाऊ ब्रिगेड बल्लारपूर, शकीला परवीन जिल्हा अध्यक्ष जमाते इस्लामी हिंद महिला शाखा चंद्रपूर यांची प्रमुख उपस्थिती रहणार आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos