श्रीनगरमध्ये चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान


वृत्तसंस्था / श्रीनगर :  जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये एका चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. शनिवारी संध्याकाळपासून श्रीनगरच्या मुजगुंड परिसरात दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये चकमक सुरू होती. यामध्ये पाच जवान देखील जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मुजगुंड परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षारक्षकांना मिळाली होती. त्यानुसार, शनिवारी संध्याकाळी लष्कर, स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी परिसरात शोधमोहिम हाती घेतली होती. संपूर्ण परिसरात नाकाबंदी करुन संशयीत घरांची तपासणी केली जात होती. त्यानंतर, लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात सुरक्षारक्षकांकडूनही जोरदार गोळीबाराला सुरूवात झाली. शनिवारपासून सुरू असलेली ही चकमक आज संपली असून अखेर तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं आहे. मृत दहशवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं जप्त करण्यात आली आहेत. परिसरात अजूनही शोधमोहिम सुरू आहे.  Print


News - World | Posted : 2018-12-09


Related Photos