महत्वाच्या बातम्या

 राणी हिराई स्त्रीभूषण पुरस्कार २०२३ वितरण संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : चंद्रपूर येथील समता संघर्ष फाऊंडेशन, मराठी हिंदी पत्रकार संघ, आणि स्नेहबंध चॅरिटेबल ट्रस्ट, यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमीकरण, प्रोत्साहन, जनजागृती आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान व सत्कार करण्याच्या उद्देशाने राणी हिराई स्त्रीभूषण पुरस्कार कार्यक्रमचे आयोजन 12 मार्च रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, दीक्षाभूमी, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला होता.      

कार्यक्रमाचे उद्घाटन वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते समाजसेविका अनुताई दहेगावकर यांच्या अध्यक्षतेखालील झाला. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किशोर जोरगेवार, आमदार चंद्रपूर, आमदार सुधाकर अडबाले आमदार नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ,  जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अँड. राहुल घोटेकर, सदस्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी उपस्थित होते.

ज्येष्ठ समाज सेविका डॉ.रजनी हजारे, स्त्रीरोग व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शर्मिली पोद्दार, ज्येष्ठ समाज सेविका प्रतिभा चिलके, अँड. सुनीता पाटील महानगर अध्यक्ष, (महिला) आम आदमी पार्टी, अँड. इतिकाशहा सामाजिक कार्यकर्त्या, रत्नमाला बावणे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, वंदना बोबडे शिक्षिका घुग्घुस, कल्याणी हुमणे पोलीस निरीक्षक, डॉ. भारती दुधानी सामाजिक कार्यकर्त्या, वासुदेव खोब्रागडे, कार्याध्यक्ष जनहित परिषद यांना महिलांना सन्मान आणि मार्गदर्शनासाठी आयोजकांनी आमंत्रित केले होते. 

सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. माता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे हस्ते पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. 

ज्यामध्ये प्रामुख्याने पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकार नेहा शंकर मानकर, विविध पुरस्कारांनी सन्मानित पत्रकार माधुरी दीपक काटकोजवार, समाज सेविका व स्माईल सोशल फाऊंडेशनच्या सचिव सीमा दीक्षित, शिक्षक व सामाजिक कार्यकर्त्या भुवनेश्वरी अनिल धर्मपुरीवार, सामाजिक कार्यकर्ते डॉ. कार्यकर्त्या वर्षाताई कोठेकर, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.भारती अजय दुधानी, शाहीन शेख आणि संपूर्ण टीम खवातीने इस्लाम, अर्चना मानलवार संस्थापक ज्ञानरचना अपंग स्नेह बहुउद्देशीय संस्था, हॉकी नॅशनल चॅम्पियन सुषमा बंडू खाडे, कौसर खान अध्यक्ष शिफा बहुउद्देशीय संस्था तथा अध्यक्ष यंग चंदा ब्रिगेड.

रंजना सुनील नाकतोडे सामाजिक कार्यकर्त्या व अध्यक्षा स्माईल सोशल फाऊंडेशन, सरिता राजेंद्र मालू अध्यक्षा फ्रेंड्स चॅरिटी ग्रुप, सुषमा नगराळे समाज सेविका, सामाजिक कार्यकर्त्या रेखा दुधाळकर, समाज सेविका पूनम गरडवा, जनहित संरक्षण परिषद व स्माईल सोशल फाऊंडेशन सर्व कार्यकर्ते, शारदा गुरुदेव भजन मंडळ, नवजीवन योग ग्रुप, नवगुरुदेव भजन मंडळ, स्त्रीशक्ती संघटना, निकिता आनंद दोडके, भाग्यश्री मेश्राम, अश्विनी तटकंटीवार आदींचा सत्कार व सन्मान करण्यात आला.   

संचालन प्रज्ञा जीवनकर व अँकर नौशाद शेख यांनी केले तर आभार डी. एस. ख्वाजा यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील दादा पाटील अध्यक्ष समता संघर्ष फाउंडेशन चंद्रपूर, डी. एस. ख्वाजा संस्थापक अध्यक्ष मराठी-हिंदी पत्रकार संघ, चंद्रपूर व जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर विदर्भ प्रिंट, कुमार जुमलवार संस्थापक उपाध्यक्ष मराठी-हिंदी पत्रकार संघ व संपादक कुमार दर्पण, हाजी अली, सौरभ धोंगडे, सुनील चौहान, ब्रिजेश तामगाडगे, अजय दुर्गे, डॉ.मोबीन सय्यद, शिल्पा कांबळे आदींनी अथक परिश्रम घेतले.





  Print






News - Chandrapur




Related Photos