महत्वाच्या बातम्या

  आजचे दिनविशेष


१४ मार्च महत्वाच्या घटना

१९३१ : पहिला भारतीय बोलपट आलम आरा मुंबई मध्ये प्रदर्शित झाला.

१९५४ : दिल्ली येथे साहित्य अकादमीची स्थापना झाली.

१९६७ : अमेरीकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचे पार्थिव आर्लिंग्टन राष्ट्रीय दफनभूमी येथे हलविण्यात आले.

२००० : कलकत्ता येथील टेक्‍निशियन आय हा देशातील सर्वात जुना स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

२००१ : सिक्कीममधील आदिवासी समाजातील चोकीला अय्यर यांनी भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिव म्हणून सूत्रे हाती घेतली.

२००१ : व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने ईडन गार्डन वर नाबाद २७५ धावा काढून या मैदानावरील सर्वोच्‍च धावांचा सुनील गावसकरचा विक्रम मोडला. तसेच एका डावात ४४ चौकार मारण्याच्या डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली.

२०१० : ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या हस्ते लोकसंस्कृतीचे उपासक आणि संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांना पुण्यभूषण पुरस्कार पुण्यात देण्यात आला.

१४ मार्च जन्म

१८७४ : फिलिप्स इलेक्ट्रॉनिक्स कंपनी चे सहसंस्थापक आंतोन फिलिप्स यांचा जन्म. (मृत्यू : ७ ऑक्टोबर १९५१)

१८७९ : नोबेल पारितोषिक विजेते जर्मन आणि अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांचा जन्म. (मृत्यू : १८ एप्रिल १९५५)

१८९९ : इर्विंग ओईल कंपनी चे संस्थापक के. सी. इर्विंग यांचा जन्म. (मृत्यू : १३ डिसेंबर १९९२)

१९०८ : विन्सेंट मोटारसायकल कंपनी चे संस्थापक फिलिप व्हिन्सेंट यांचा जन्म. (मृत्यू : २७ मार्च १९७९)

१९३१ : ख्यातनाम अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचा जन्म. (मृत्यू : १३ जानेवारी २०११)

१९३३ : ब्रिटिश अभिनेता मायकेल केन यांचा जन्म.

१९६१ : ब्लॅकबेरी लिमिटेड चे संस्थापक माईक लाझारीडीस यांचा जन्म.

१९६३ : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रूस रीड यांचा जन्म.

१९७४ : पार्श्वागायिका साधना घाणेकर उर्फ साधना सरगम यांचा जन्म.

१९७२ : भारतीय कवी इरोम चानू शर्मिला यांचा जन्म.

१९७४ : भारतीय दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर रोहित शेट्टी यांचा जन्म.

१४ मार्च मृत्यू

१८८३ : जर्मन तत्वज्ञ आणि कम्युनिझमचे प्रणेते कार्ल मार्क्स यांचे निधन. (जन्म : ५ मे १८१८)

१९३२ : अमेरिकन संशोधक आणि इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक जॉर्ज इस्टमन यांचे निधन. (जन्म : १२ जुलै १८५४)

१९९८ : अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक दादा कोंडके यांचे निधन. (जन्म : ८ ऑगस्ट १९३२)

२००३ : कविवर्य आणि श्रेष्ठ गझलकार सुरेश भट यांचे निधन. (जन्म : १५ एप्रिल १९३२)

२०१० : ज्ञानपीठ विजेते लेखक आणि कवी विंदा करंदीकर यांचे निधन. (जन्म : २३ ऑगस्ट १९१८)

२०१० : इंग्रजी सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ, विश्वशास्त्रज्ञ आणि लेखक जे सिद्धांत कॉस्मोलॉजी सेंटर फॉर रिसर्चचे डायरेक्टर होते.स्टीफन हॉकिंग यांचे निधन. (जन्म : ८ जानेवारी १९४२)





  Print






News - todayspecialdays




Related Photos