कोरपना-वणी मार्गावर टाटा मॅजिक ला ट्रकने धडक दिल्याने ११ जण जागीच ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
  कोरपना-वणी रस्त्यावर टाटा मॅजिक गाडीला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ११ जण जागीच ठार झाले आहेत. या ११ जणांमध्ये ७ महिला ३ पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. कोरपना या गावापासून दोन किमी अंतरावर हा अपघात घडला. रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडल्याचे समजते आहे. या अपघातात इतर चार जण जखमी झाले आहेत. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र या चौघांचीही प्रकृती गंभीर आहे असे समजते आहे.
टाटा मॅजिकमध्ये १५ प्रवासी होते , मृतांमध्ये सात महिला, तीन पुरुष आणि एक लहान मुलगा अशा ११ व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला तर चार व्यक्ती जखमी आहेत या जखमींना कोरपना येथील प्राथमिक उपचारांसाठी ग्रामिण रुग्णालय येथे आणण्यात आले अजून पर्यंतत मृतांची ओळख पटलेली नाही.  Print


News - Chandrapur | Posted : 2018-12-09


Related Photos