घोडेझरी, फुलबोडी येथील नागरिकांनी नक्षल्यांनी हत्या केलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ उभारले स्मारक


- नक्षल सप्ताहाचा केला विरोध 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / पेंढरी (धानोरा) : 
धानोरा तालुक्यातील घोडेझरी आणि  फुलबोडी येथील नागरिकांनी नक्षल्यांनी हत्या केलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ  स्मारक उभारून श्रद्धांजली अर्पण केली. तसेच नक्षलविरोधी घोषणा देऊन नक्षल सप्ताहाचा तीव्र निषेध केला. 
 काल ७ डिसेंबर रोजी   गोडलवाही हद्दीतील  घोडेझरी गावातील नागरिकांनी एकत्र येऊन नक्षल्यांनी पुकारलेल्या PLGA  सप्ताहाला विरोध करून नक्षल्यांनी  ६ फेब्रुवारी २०१५ रोजी   हत्या  केलेल्या इंदरशहा केशव परसे  यांचे स्मारक उभारून  त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.  तसेच नक्षलवाद्याचा विरोध करत  "नक्षलवाद मुर्दाबाद, जय सेवा जिंदाबाद "अशा घोषणा देत नक्षल सप्ताहाचा तीव्र निषेध केला. 
तसेच आज  ८ डिसेंबर रोजी  पोलीस मदत केंद्र कारवाफ़ा  हद्दीतील  फुलबोडी गावातील नागरिकांनी एकत्र येऊन  नक्षल्यांनी  हत्या  केलेल्या सुनिल सिताराम करंगामी  यांचे स्मारक उभारून  त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.  नक्षल्यांचा  होणारा त्रास व त्यांची हुकुमशाही मोडून काढण्याच्या   हेतूने फुलबोडी  गावतील व परिसरातील नागरिक एकत्र येऊन   "नक्षलवाद मुर्दाबाद,जय सेवा जिंदाबाद "अशा घोषणा देत नक्षल सप्ताहाचा तीव्र निषेध केला.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-08


Related Photos