महत्वाच्या बातम्या

 बोदालदंड येथे नववी शिक्षण परिषद संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : कोरची केंद्राची नववी शिक्षण परिषद जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोदालदंड येथे पार पडली. शिक्षण परिषदेचे अध्यक्ष हीरा रामटेके, केंद्र प्रमुख केंद्र कोरची प्रमुख पाहुणे अरविंद टेंभूरकर मु.अ. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोरची, त्रिवेणी गायकवाड, हेमलता तितीरमारे, उषा बोरकर, प्रतिभा भेंडारकर, वर्षा डोर्लिकर, सुलभा लांडगे, रोशनी दाते, सोनाली सोरते, मुजफ्फर शेख, बंडु नागरे, ताराचंद बल्लारे, भूषणकुमार मेश्राम, कमलेश मडावी, चंद्रप्रकाश बिसेन, जितेंद्र साहाळा, फुलोरा सुलभक, विनोद भजने, दिलीप नाकाडे, सुभाष गहाणे,  खेडीकर मॅडम, प्रमिला बुद्धे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक अरविंद टेंभूरकर मु.अ .कोरची यांनी केले. शिक्षण परिषदेचे विशेष म्हणजे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका त्रिवेणी गायकवाड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जांभळी, नेट परीक्षा उत्तीर्ण, जितेंद्र साहाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मयालघाट यांचे शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. व आंतर जिल्हा बदली झालेल्या आणि जिल्हा अंतर्गत बदली झालेले शिक्षक बंधू आणि शिक्षिका भगिनी यांना शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन निरोप देण्यात आले. 

तसेच फुलोरा सुलभक यांनी डॅशबोर्ड संदर्भात मार्गदर्शन केले. फुलोरा मूल्यमापन संदर्भात मार्गदर्शन केले, न्यास व युडायस बाबत आणि प्रशासकीय बाबींवर मार्गदर्शन हीरा रामटेके केंद्र प्रमुख यांनी मार्गदर्शन केले, गणित विषयाचे मार्गदर्शन चिमनकर यांनी केले, इंग्लिश विषयावर गटनिहाय चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाचे संचालन विषय शिक्षक नरेश रामटेके तर आभार कांता साखरे यांनी केले. यावेळी परिषदेकरीता विशेष सहकार्य  संतोष भलावी, कमलेश मडावी, लेखचंद खंडाते, मारोती अंबादे, चंदू बिसेन, देवेंद्र पारधी, केशोराव भोंडे, भुषण मेश्राम, संतोष टिकले, अशोक कोरेटी व केंद्रातील इतर शिक्षक बंधूभगिणीने परिषदेकरीता विशेष सहकार्य केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos