महत्वाच्या बातम्या

 संस्कृतीच्या माध्यमातून चांगले संस्कार घडावे : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार


- चिरेपली येथे वीर बाबूराव शेडमाके व सल्ला गागरा स्मारकाचे उद्घाटन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी : धर्म आणि संस्कृती माणसाला जगण्याची दिशा देतात त्यामुळे प्रत्येक समाजातील लोकांनी आपले धर्म आणि संस्कृतीचे चिकित्सक दृष्टीकोन तपासणी करून चांगल्या गोष्टीचे जतण केले पाहिजे, त्यातूनच येणाऱ्या पिढीला चांगले संस्कार आपल्याला देता येईल असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले. अहेरी तालुक्यातील चिरेपली येथील आदिवासी समाजाचा प्रतिक असणाऱ्या सल्लागागरा व वीर बाबूराव शेडमाके यांच्या स्मारकाच्या उदघाटन सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाला उदघाट्क म्हणून बीरस बिग्रेड राष्ट्रीय अध्यक्ष सतीश पेंदाम होते.
यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, खाँदलाचे सरपंचा सुमन आलाम, राजारामचे सरपंच नागेश कन्नाके, मेडपलीचे सरपंच निलेश वेलादी, गटाचे सरपंचा जेट्टी, सामाजिक कार्यकर्ता मौकाशी आणि मोठ्या संख्येने समाज बांधव यावेळी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos