महत्वाच्या बातम्या

 पद्मशाली समाज महिला तालुका सिंदेवाहीच्या वतीने जागतिक महिला दिवस साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुका महिला पद्मशाली समाज च्या वतीने जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करून महिला दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहणे म्हणून लागलेले पद्मशाली समाजाच्या विदर्भ अध्यक्षा सौ. रश्मी परसावार, मुख्याध्यापिका घुघुसकर, डाॅं. बदनोरे मॅडम, सिंदेवाही तालुका पद्मशाली समाज महिला अध्यक्षा सौ.संध्या दिलीप बल्लेवार यांनी मार्गदर्शन केले.

महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम व वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.

यानंतर स्नेहा भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. संध्या बल्लेवार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन तृप्ती तुम्मे यांनी केले .

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सपना ताल्लेवार व माधुरी कोकुलवार यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वीतेकरिता पद्मशाली समाज महिला भगिनी उपस्थित राहून सहकार्य केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos