महत्वाच्या बातम्या

 आष्टी येथे स्वतंत्र विद्युत फीडर करिता आंदोलन करण्याच्या इशारा : प्रा. डॉ. भारत पांडे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / आष्टी : सतत तीन वर्षापासून चांदा ते बांद्यापर्यंत, गावातून-मुंबईपर्यंत पत्रव्यवहार करून स्वतंत्र विद्युत फीडर करिता पाठपुरावा करून आष्टीकरिता ३२ लाखाचे स्वतंत्र विद्युत फीडर प्रा. डॉ. भारत पांडे अध्यक्ष ओम विकास बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आले. मंजूर झालेले स्वतंत्र विद्युत फिडर अजूनही सुरू न केल्यामुळे एका महिन्यापर्यंत आष्टी येथील स्वतंत्र विद्युत फीडर सुरू न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या इशारा प्रा. डॉ. भारत पांडे ओमविकास बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर यांनी प्रसिद्ध पत्राद्वारे दिलेला आहे. 

सतत तीन वर्षाच्या पाठपुराव्यानंतर आष्टी येथे ३२ लाखाचे स्वातंत्र विद्युत फीडर मंजूर करण्यात आले. ही बातमी परिसरामध्ये पसरतात अनेक छोट्या व्यापाऱ्यांनी आता आपला पैसा वाचेल इन्व्हर्टरच्या पैसा वाचेल अशी अपेक्षा व्यक्त केली त्याचबरोबर आष्टी परिसरातील जे छोटे व्यापारी आहे. ज्यात चक्की आटा, राईस मिल,आईस्क्रीम वाले, पाणी विकणारे, लस्सी वाले यांच्याही व्यवसाय विद्युतवर अवलंबून असतो आणि येणाऱ्या उन्हाळा आणि या उन्हाळ्यात असणारे विद्यार्थ्यांचे पेपर अभ्यासाची घाई शासनाची नोकर भरती अशा विविध मार्ग आज व्यक्ती अमीर असो वा गरीब शहरातील असो का खेड्यातील प्रत्येकाच्या जीवन विद्युतवर अवलंबून आहे एकीकडे गरज नसताना शहरातील लोकांना मोठमोठ्याला मेट्रो ट्रेन, उडान पूल, लोकांच्या विरुंगगडासाठी मोठमोठाले पार्क मिळत आहे तर दुसरीकडे सामान्य लोकांचे जीवन, अर्थव्यवहार ज्या विजेवर अवलंबून आहे. तेही वीज जास्त पैसे भरून देखील २४ घंटे मिळत नाही आणि म्हणून अशा वेळेला छोटे व्यापाऱ्यांच्या आर्थिक नुकसान झाल्यास त्यांना बँका देखील आर्थिक मदत करत नाही आणि या सर्वामुळे केवळ ३२ लाख मंजूर करण्याकरिता तीन वर्षे लागले आता ते चालू होण्यासाठी किती वर्ष वाट पाहावी लागेल. हा प्रश्न आष्टी परिसरातील सामान्य जनता, छोटे व्यापारी या प्रसिद्ध पत्राद्वारे शासनाला करीत आहे आणि म्हणून जनतेच्या मनातील रोष कमी करण्याकरिता फ्री नको पैसे देऊन तरी स्वतंत्र विद्युत पुरवठा द्या अशी मागणी सामान्य जनता करीत आहे. 

तसेच संस्थेद्वारा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पत्रव्यवहार केलेला आहे. तरी आष्टी परिसरातील सामान्य जनतेच्या अंत न पाहता लवकरात लवकर स्वतंत्र विद्युत फीडर चे काम सुरू करून आष्टीतील व्यापाऱ्यांना सामान्य जनतेला २४ घंटे विज मिळून द्यावी अशी नम्र विनंती या प्रसिद्ध पत्राद्वारे शासनाला केलेली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos