दुचाकीची समोरा समोर धडक, दोन गंभीर जखमी


- चिमूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  नेरी : 
चिमूर मार्गावरील डी.ए.ड. कॉलेज जवळ दोन दुचाकीची सामोरा समोर धडक झाल्याने अपघात घडला. या अपघातात दोघे जण गंभीर असून त्यांना उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
 नेरी येथील गुलाबराव खाटीक हे जनता विद्यालय येथे कर्मचारी पदावर कार्यरत असून विद्यार्थी घेऊन तळोधी नाईक इथे विज्ञान प्रदर्शनाला गेले होते. परत येत असताना नेरी वरून चिमूर कडे  जाणारे भिसी येथील दोन युवक  यांनी डी.ए.ड कॉलेज जवळ गुलाबराव खाटीक यांच्या दुचाकीला जोरधार धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. तसेच भिसी येथील मनोज नामक युवक गंभीर जखमी झाला  असून दोन्ही युवक मद्यधुंद अवस्थेत असल्याची चर्चा प्रत्यक्ष अपघात बघणाऱ्यांकडून होत होती.  त्या दोघांनाही चिमूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  Print


News - Chandrapur | Posted : 2018-12-07


Related Photos