महत्वाच्या बातम्या

  मोहगांव येथे आदर्श सामुहिक विवाह संमेलन संपन्न


- आदिवासी कवर समाज सेवा संस्था खडकाघाट(सोहले) क्षेत्र कोरची विघमाने

- मोहगांव येथे 21 जोडप्यांचे विवाह सम्मेलन संपन्न

- दहा हजाराच्या वर‌ महिला पुरुषाची उपस्थिति    

- कवर समाजातील‌ पाच लोकाचे सत्कारमृती शाल- शिफळ देऊन सत्कार खा.अशोक नेते याच्या हस्ते करण्यांत आली त्या आदर्श विवाह संमेलन करणे‌ काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : आदिवासी कवर समाज सेवा‌ संस्था खडकाघाट (सोहले) क्षेत्र कोरची विद्यमाने येथे ११ मार्च २०२३ रोज शनिवार दुपारी दोन वाजता मोहगांव येथे आदर्श विवाह संमेलनांचे उद्घाटक म्हणुन खासदार अशोक नेते, अध्यक्ष म्हणुन भारत दुधनांग संचालक.म.रा.आ.वि.मं नाशिक, विशेष अतिथी, अंबिका बंजार सभापती पंचायत समिती देवरी, मनोज अग्रवाल तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी, कोरची, रामसुराम काटेंगे गोंड‌समाज अध्यक्ष कोरची, प्रा.देवराव गजभिये, आनंद चौबे, गणेश सोनवानी नायब तहसिदार, पितांबर आरगदुल्ला जिल्हा उपाध्यक्ष कंवर समाज छ.ग.महा., कोरची पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक, अमोल फडतरे, गणेश फुलकवर ए.पी.आय.के.डी.चंद्रमा वडेगांव, सुनिता मडावी‌ सरपंच, नरेश जमकातन, चेतन‌ जमकातन, पदमाकर 

मानकर, देशरबाई सोनकुकरा, रूखमन‌‌ घाटघुमर, डॉ.शैलेंद्र बिसेन नगरसेवक, अशोक फुलकवर, उमेश बागडेहरिया, जासल सांगसुरवार, लग्नुसन कार्यपाल, प्रा.मुरलीधर‌ रुखमोडे भिकम फुलकवर क्षेत्र अध्यक्ष (आदिवासी कवर समाज) पत्रकार राष्ट्रपाल नखाते, राहुल‌ अंबादे, आसाराम फूलकवर, राधेश्याम फूलकवर, परमानंद पूजेरी, प्रकाश गंगाकाचूर मान्यवर उपस्थिति  होते.   

आदर्श विवाह संमेलनांचे संचलन प्रा. गणेश सोनकलकी प्रस्ताविक भिकम फुलकवर अध्यक्ष कवर समाज यांनी केले. 

या आदर्श संमेलनाध्ये सत्कारणी मूर्ती म्हणुन गणेश फुलकवर (ए.पी.आय.)कोरची.गणेश सोनवानी नायब तहसिलदार कोरची, चेतन जमकातन लेखा अधिकारी गडचिरोली ‌जितेंद्र साहाळा (SET) उत्तीर्ण, कु.भाग्यश्री कपाट BAMS निवड करिता  खा अशोक नेते व माण्य वराच्या हस्ते शालसिफळ देऊन सत्कार करण्यांत आला. उद्घाटक म्हणुन‌ खासदार अशोक नेते म्हणाले की कोरोनाचा काळ सोडुन कवर समाजाचे सामूहीक विवाह दरववर्षी लग्न सोहळा कमी खर्चातून होतो. त्यामुळे कवर समाजाप्रमाने आदर्श सामुहीक लग्न सोहळा करण्याची गरज आहे. 

असे प्रतिपादन उद्घाटनीय भाषणात म्हणाले.  वर वधूंना शुभेच्छा देण्यात आले. तसेच मनोज अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले. तसेच‌ आदिमान्य‌ भाषने झाली. आदर्श विवाह संमेल मध्यें एकूण वर -वधुचा परिचय करून 21 जोडपाच्या विवाह लावुन देण्यात आले. त्यांना भेट वस्तु ‌देऊन पुढील वाढचालीला शुभेच्छा  देण्यात आले. 

आदर्श विवाह सोहळ्याचा दहा हजारोच्या वर लोकांची‌ महिला- पुरुषाची उपस्थित होते.

या आदर्श विवाह संमेलन यशस्वीतेसाठी कोरची तालुक्यातील कवर‌ समाजातील पदाधिकारी सदस्य व महिला पुरुषानी अथक परिश्रम घेतले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos