रत्नापुर - नाचनभट्टी रस्त्याची दुरावस्था
- प्रवास्यांना करावी लागते तारेवरची कसरत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर- नाचनभट्टी हा जवळपास दोन कीमी अंतराचा रस्ता आहे. सदर रस्ता हा डांबरीकरणाचा आहे पण सध्या स्थितीत ह्या रस्त्याचे डांबरीकरण उखडल्याने जागो जागी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे हया रस्त्याने प्रवास करतांना प्रवाश्याना तारेवरची कसरत करुण व जीव मुठीत घालून प्रवास करावा लागतो. या रस्ताने पायी जाणारे, सायकल, मोटरसायकल, चारचाकी वाहणे व बैलबंडी घेवून जाणारे शेतकरी व शाळा महाविद्यालयात नवरगांवला येणारे शाळकरी मुले-मुली यांची वर्दळ असते. तसेच तालुका सिंदेवाही येथे जाण्यासाठी हा कमी अंतराचा रस्ता आहे. त्यामुळे प्रवासी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात अगदी अल्पवधीत ह्या रस्त्याचे डांबर उखडलेले आहे. त्यामुळे जागोजागी गिट्टी बाहेर निघुन खड्डे पडलेले आहेत. या रस्त्याने शेतकरी वर्ग रात्रो-बेरात्र या रस्त्याने प्रवास करताना दिसतात, त्यामुळे सबधीत विभागांनी त्वरीत या रस्त्या कडे लक्ष वेधून या गंभीर समस्येची दखल घ्यावी व त्वरीत रस्ता प्रवासा योग्य करून दयावा जेणेकरून कोणतीही अनुचीत घटना घडणार नाही आणी प्रवाश्यांना सुखकर प्रवास करता येईल. रत्नापूर -नाचनभट्टी हा दोन किमी चा रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी प्रवाश्यांनी केली आहे.
News - Chandrapur